👁 9 Views

अपंगाने थाटला स्मशानभुमीत संसार…विक्रम शिरसट मित्रमंडळाने दिला आधार

जगण्याचा संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो.मात्र स्मशानभुमीत राहून शरीराने अपंग असतानाही मयताच्या सरणासाठी लाकडे रचून मिळालेल्या बिदागीवर स्मशानभूमीतीलच एका कोपर्‍यात आपला संसार थाटलेल्या दादा यशवंत वाघमारे यांच्या जिवन संघर्षाची माहीती मिळताच येथील विक्रम शिरसट मित्र मंडळाने न.पा.पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यांच्या हस्ते दादा वाघमारे यास प्रापंचीक साहित्य भेट देत या अपंगाच्या स्वाभिमानाने जगण्याचा लढाईस हातभार लावला आहे.
मुळेचे इंदापूर येथील असलेले दादा वाघमारे हे गेल्या आठ वर्षापासून पंढरीत वास्तव्यास आहेत.पांंडुरंगाच्या पंढरीत जगण्याचा आधार मिळेल या आशेने ते येथे आले होते. त्यांचा एक हात व एक पाय अधू आहे.मात्र भिक्षा न मागता काम करुन स्वाभिमानाने जगण्याच्या निर्धारामुळेच दादा वाघमारे यांनी थेट स्मशानभुमी गाठली आणि येथे सरणासाठी लाकडे रचण्याचे काम करण्यास सुरुवात केली.स्मशानभूमीत बांधलेल्या निवार्‍याच्या जागेच्या कोपर्‍यात तीन धोंड्याची चूल मांडून आपला प्रपंच नेटका करण्याचा लढा त्यांनी सूरु केला.अपंगत्व असले तरी एका हाताने स्वयंपाक करुन ते आपले पोट भरतात. स्मशानभूमी सारख्या विराण जागी एकट्याने रहात असलेला हा अपंग म्हणजे जगण्याच्या संघर्षाचेच एक प्रतिक आहे.
विक्रम शिरसट मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या नजरेस ही बाब आली असता त्यांनी अधिक माहीती जाणून घेतली त्यावेळी दादा वाघमारे यांचा संघर्ष समोर आला.आणि कार्यकर्ते भारावून गेले.व सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि विक्रम शिरसट यांच्या हस्ते त्यास स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी व सामान ठेवण्यासाठी एक ट्रंक आदी प्रापंचीक साहित्य भेट देवून त्याचा सत्कार केला.यावेळी गोविंद खराडे,अमोल तारापूरकर,अमर घाटे,आनंद कोळी,किशोर दंदाडे आदी उपस्थित होते.विक्रम शिरसट मित्र मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *