👁 7 Views

नाशिकरोड अत्याचार प्रकरणातील आरोपीस फाशी द्या……. पंढरीत गवळी समाजाची मुक मोर्चाद्वारे मागणी

* विविध पक्ष संघटनांचा मोर्चात सहभाग *
नाशिकरोड येथे गवळी समाजातील चार वर्षीय बालीकेवर सुभाष झंवर या नराधमाने अमानुष अत्याचार केला आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी व सदर गुन्ह्यातील आरोपीस जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पंढरपूर शहर व तालुका गवळी समाजाच्या वतीने आज पंढरीत मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चात पंढरपूर शहर व तालुक्यासह सोलापूर येथील समाज संघटना,अकलुज गवळी समाज तसेच विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.मोर्चाचे नेतृत्व गवळी समाजातील महिलांनी केले.
सदर मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता भजनदास चौक येथील गवळी समाज मठापासून करण्यात आली.प्रदक्षिणा रस्ता मार्गे शिवाजी चौकातून हा रस्ता तहसिल कार्यालय येथे दाखल झाला.यावेळी गवळी समाज बांधवांसह युवक कॉगेेस(आय)चे
शहराध्यक्ष शंकर सुरवसे,बाबा ग्रुपचे उत्तम चव्हाण,बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष किशोर भोसले,राष्ट्रवादी युवक कॉगेसचे अध्यक्ष संदीप मांडवे,किरण शहा,सोनार समाजाचे नेते काका बुराडे,आनंदराज साठे,समाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चास आपला पाठींबा व्यक्त केला.
नाशिकरोड येथे चार वर्षीय बालीकेवर खाऊचे अमिष दाखवून अत्याचार करण्याची घटना उघडकीस येताच शांतताप्रिय समाज म्हणून ओळख असलेल्या गवळी समाजाच्या भावना संतप्त बनल्या असून राज्यभर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे.आज पंढरपूरात आयोजीत मोर्चात गवळी समाजातील महिला व मुली आक्रमकपणे सहभागी झाल्याचे दिसून आले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *