पंढरपूर दि.18 :-तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना बायोमॅट्रीक रेशन प्रणालीअंतर्गत ‘पॉस’ (पीओस) मशीन बाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी तालुक्यातील 146 रेशन दुकानदारांना ‘पॉस’ (पीओस) मशीनचे वाटप करण्यात आले.
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, जिल्हा पुरवठा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत पीओएस मशीन बाबतचे प्रशिक्षण प्रांत कार्यालयातील सांस्कृतीक भवन येथे देण्यात आले यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रमा जोशी, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, पुरवठा विभागाचे आर.व्ही. सावळे उपस्थित होते.
जून महिन्यामध्ये प्रात्र कार्डधारकांना धान्याचा कोटा उपलब्ध होणार असून,आता मशीनमध्ये ‘पॉस’ (पीओस) केल्यानंतर धान्याचे वाटप होणार आहे. जिल्हाधिका-यांच्या सूचनेनुसार प्राप्त होणार सर्व धान्यसाठा हा ई-पॉस मशीन व्दारेच वाटप करण्याचे सर्व दुकानदारांना आदेशीत करण्यात आले आहे. तसेच रेशन दुकानदारांनी धान्य विक्री रजिस्टरची साक्षांकित प्रत व पावती पुस्तकांची साक्षांकित प्रत तहसिल कार्यालयामध्ये जमा करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.आधार नोंदणी झालेल्या पात्र कार्डधारकांनी आपल्या आधारकार्डची छायांकित प्रत स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे अथवा तहसिल कार्यालय येथे जमा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. स्वस्त धान्य विभागातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले असून, यासाठी तालूक्यातील प्रत्येक रेशन दुकानदाराला ‘पॉस’ (पीओस) मशीनचे वाटप व त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी तालुक्यातील रेशनदुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




