👁 8 Views

कासेगावातील एकास पंढरपूरात मारहाण

पंढरपूर लाईव्ह वृत्त दि.19 मे 2017

पंढरपूरमधील सांगोला चौकातून कासेगावातील एकास गाडीत घालुन नेत मारहाण झाल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

पोलिसांकडूपन समजलेली हकीकत अशी की, विशाल संभाजी गायकवाड (23), रा.कासेगाव, ता.पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी-श्रीकांत विजय कोताळकर, रा.पंढरपूर, वैभव पांडुरंग लिंगे, रा.कासेगाव, ता.पंढरपूर व अन्य दोघांनी 18/5/2017 रोजी सकाळी साडे दहा वाजणेच्या सुमारास सांगोला चौक, पंढरपूर येथे मागील भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीस सांगोला चौकातून इनोव्हा कारमध्ये जबरदस्तीने बसवले व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण केश्रली.

यातील आरोपी श्रीकांत कोताळकर याने व इतर आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हाताच्या दंडावर, मानेवर, पाठीवर, गळ्यावर, डाव्या पायाच्या पिंडरीवर लोखंडी पाईपने व काठीने मारहाण करुन दुखापत केली. व शिवीगाळ, दमदाटी केली असल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली असून आरोपींवर भादवि 363, 342, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोसई धोत्रे हे करीत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *