👁 7 Views

पंढरपूरच्या भक्क्ती मार्गावरील एकास घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण..

पंढरपूर लाईव्ह वृत्त दि.19 मे 2017

पंढरपूरमधील योगीराज अपार्टमेंट, केंद्रे महाराज मठा शेजारी, भक्क्ती मार्ग येथे वास्तव्यास असणार्‍या एकास त्याच्या घरात घुसून लाथाबुक्क्ूयाने मारहाण झाल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

पोलिसांकडू समजलेली हकीकत अशी की, वरील ठिकाणी वास्तव्यास असणारे दिलीप गणपतराव कुकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 17 मे 2017 रोजी रात्री 10 वाजणेच्या सुमारास फिर्यादी हे आपले घरासमोरील रस्त्यावर थांबले असताना रिक्षातून आलेले आरोपी रमेश अनिल थिटे व सत्यम धुमाळ दोघे रा. शिवरत्न नगर, पंढरपूर यांनी फिर्यादीस ‘तुला दिसत नाही का?’ असा जाब विचारत गालात चापटा मारल्या. यावेळी या सर्वांत बाचाबाची झाली. यानंतर या दोन आरोपींनी फिर्यादीचे घरात घुसून त्यास जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाण करताना सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पतन्ीस, मुलीस व मुलासही आरोपींनी मारहाण केली. अशी फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाणेत दाखल झाली असून आरोपींविरुध्द भादवि कलम 492, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक तपास सहा. अधिक्षक निखील पिंंगळे हे करीत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *