पंढरपूर लाईव्ह वृत्त दि.19 मे 2017
पंढरीतील समता नगर येथील एका घराचे मागील दरवाजाचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्यांनी घरातील लाखो रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरुन नेल्याबाबतची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाणेत दाखल झाली आहे.
पोलिसांकडून याबाबत समजलेली हकीकत अशी की, दि. 18 मे 2017 रोजी सकाळी रात्री 9 वाजणेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी समता नगर, लिंक रोड पंढरपूर येथील शहाजी नामदेव बाबर यांच्या घराचे मागील दरवाजाचे गेट व कुलूप कोयंडा तोडून व उचकटून घरात प्रवेश केला. व घरातील रोख रक्कम एक लाख 23 हजार रु. 72 हजार रु. चे 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण, 36 हजाराच्या सोन्याच्या चैन, 15 हजाराच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरुन नेला.
पंढरपूर शहर पोलिस ठाणेत अज्ञात चोरट्यांविरुध्द भादवि 454, 457, 380 अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे हे करीत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





