गेली ५० वर्षांपासून श्री क्षेत्र शेगाव ते पंढरपूर असा सुमारे ७२५ किलोमीटर चा पायी प्रवास करत येणारी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या पालखीचे प्रस्थान बुधवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी ठीक ७ वाजता श्री क्षेत्र शेगाव येथून होणार असल्याची माहिती पंढरपूर संस्थानचे नंदकिशोर ठाकरे यांनी दिली .अत्यंत शिस्तबद्ध रीतीने येणारा पालखी सोहळा अशी यांची ख्याती असून .नेमून दिलेल्या पद्धतीनेच सहभागी वारकरी थोडी हि शिस्त मोडत नाहीत ,अकोला येथे २ जूनला तर एकादशी दिवशी पालखी देऊळगाव येथे आगमन होणार आहे ,पालखी सोहळा मालेगाव येथे ७ जून ला दुपारचा विसावा घेणार आहे व परभणी येथे पालखी सोहळा १४ जून ला आणि परळी येथील आगमन १८ जून ला असणार आहे ,सोलापूर येथे पालखी सोहळा आषाढ शुद्ध चतुर्दशी म्हणजेच २७ जूनला आगमन होणार आहे तर १
जुलै रोजी सोहळा मंगळवेढा मुक्कामी असणार आहे ,पालखी सोहळ्याचे आगमन विठुरायाच्या नगरीत आषाढ शुद्ध नवमीला म्हणजे २ जुलै ला होणार आहे सुमारे आठवडाभर पालखीचा मुक्काम गजानन महाराज मठात असेल तर परतीचा प्रवास आषाढ शुद्ध पौर्णिमेला ९ जुलै रोजी सुरु होणार आहे सकाळी ६ वाजता आरती होऊन पालखी परतीच्या प्रवासाला निघणार असून पहिला मुक्काम करकंब येथे असणार आहे तर सोमवारी १० जुलै रोजी कुर्डवाडी मुक्कामी तर बार्शीला १२ जुलै रोजी आगमन होणार आहे ,बीड येथे रविवारी १६ जुलै रोजी दिवसभर थांबणार असून जालना येथे २० जुलै एकादशी रोजी असणार आहे तर ३० जुलै ला पालखी सोहळा शेगाव ला पोहचणार आहे
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





