आधुनिक भारताचे व संगणक क्रांतीचे प्रणेते मा.पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा स्मृतीदिन पंढरपूर शहर व तालुका कॉग्रेस कमेटीच्या वतीने आंतराष्ट्रिय दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला.येथील हुतात्मा स्मारक जिजामाता उद्यान येथे आयोजीत कार्यक्रमात स्व.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन ज्येष्ठ मार्गदर्शक माऊली गवळी यांच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आनंदराव गायकवाड हे होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पंढरपूर शहर कॉग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अशपाक सय्यद यांनी स्व.राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या बलीदानाची महती वर्णन केली.कॉग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणात माहीती आणि तंत्रज्ञानाचा समावेश करुन त्यांनी आधुनिक भारताच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिले आहे.यावेळी डॉ.आनंदराव गायकवाड,ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द.बडवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनाचे महत्व विषद करताना पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले म्हणाले की,स्व.राजीव गांधी यांनी या देशासाठी बलीदान दिले आहे.आपण दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहोत हे माहीत असतानाही स्व.राजीव गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांचे दु:ख जाणून घेण्याचे टाळले नाही.आज देशात दुरसंचार यंत्रणा व मोबाईल क्रांती पहावयास मिळत आहे ती त्यांच्या दूरद्रष्टीतूनच.अशा या महान नेत्याने देशासाठी दिलेल्या बलीदानाची दखल आंतराष्ट्रिय समुदायाने घेत त्यांच्या हत्येचा दिवस हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
या कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते मामासाहेब फलटणकर,दिपक भोसले,सुहास भाळवणकर,द.बडवे,अशपाक सय्यद,प्रा.अशोक डोळ,समीर कोळी,राजू उराडे,अमर सुर्यवंशी,गणेश माने,संदीप माने,प्रा.सुदर्शन मसुरे,देवानंद इरकल,वीर शेख,दत्तात्रय झरकर,समाजसेवक दिपक येळे,अनिकेत कापसे,सुनिल अधटराव,समाजसेवक महादेव धोत्रे,प्रताप रजपूत,भाई राजेंद्र भोसले नितिन गांधी यांच्यासह पंढरपूर शहर व तालुका कॉग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




