👁 11 Views

अॅसिड हल्ल्यातील पीडितेला मिळाला आयुष्याचा जोडीदार; विवेक ओबेरॉयने गिफ्ट केला फ्लॅट



मुंबई- एका शुल्लक कारणावरून चुलत भावाकडून झालेल्या अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिता बेनबंसी (26) हिला मंगळवारी आयुष्याचा जोडीदार मिळाला. एका मिस्ड कॉलने ललिताचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. राहुल कुमार (27) हा तरुणासोबत ललिताने अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतले. उल्लेखनिय म्हणजे ललिता आणि राहुलला बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेराय याने फ्लॅट गिफ्ट केला आहे.

17 ऑपरेशननंतर ललिता झाली बरी…

– 2012 मध्ये चुलत भावाने ललिताच्या चेहर्‍यावर अॅसिड फेकले होते. ललिताचा संपूर्ण चेहरा भाजला होता. तिच्यावर तब्बल 17 सर्जरी करण्यात आल्या. तेव्हा कुठे ती बरी झाली.
– ललिता आणि राहुलने ठाणे कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला. नंतर मुंबईत रिसेप्शन पार पडले. या सोहळ्याला अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या अनेक तरुणी- महिला सहभागी झाल्या होत्या.
– ललिता मूळ उत्तर प्रदेशातील आझमगड येथील आहे
.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *