दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रुप येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विठ्ठल लक्ष्मण ऐवळे यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरु असून या कामाची पाहणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी ऐवळे कुटुंबाची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन घरकुल बांधकामाची माहिती घेतली व ऐवळे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, जिल्हयाचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार शरद बनसोडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भरुड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




