नाशिक : गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला असला तरी यंदा नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंंडोरी या तालुक्यांना पाणीटंचाई भेडसावत आहे. येथील विविध आदिवासी पाड्यांवरील विहिरींनी तळ गाठला असून, हातपंप कोरडेठाक पडले आहे. टॅँकरने पाणी विहिरीत टाकल्यानंतर महिलांची त्या विहिरीभोवती मोठी झुंबड उडते आणि जणू कोण किती लवकर विहिरीत डबे सोडून पाणी शेंदणार याची स्पर्धाच यावेळी बघावयास मिळते.
Posted inMaharashtra





