👁 8 Views

12 वीच्या निकालाची‍ ‘तिने’ घेतली धास्ती; आत्महत्येची चिठ्‍ठी लिहून गेली घरातून निघून

पिंपरी चिंचवड- बारावीच्या परीक्षेत पास होणार की नाही, या धास्तीने एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करत असल्याची चिठ्‍ठी लिहून घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात ही घटना आहे.


मिळालेली माहिती अशी की, शिवानी रवींद्र राजपूत (वय-19, रा, संगमगर, जुनी सांगवी) ही तरुणी मंगळवारी (दि. 23) सकाळी 5 वाजेपासून बेपत्ता आहे. घरात कोणालाही काहीही न सांगता ती निघून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागेल, अशी अफवा पसरली असल्यामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याची देखील चर्चा आहे.


‘मला बारावीचे पेपर अवघड गेले आहेत. मला माहीत आहे की मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.’ अशी चिठ्ठी लिहून शिवानी घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी शिवानीच्या वडिलांनी सांगवी पोलिस ठाण्यात तरुणी हरवल्याची नोंद केली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *