👁 9 Views

लुटारुंचा एकाच कुटुंबातील ४ महिलांवर बलात्कार, कुटुंब प्रमुखाची हत्या

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील यमुना एक्सप्रेसवेवर एका टोळक्याने एका कुटुंबाला लुटून त्याच कुटुंबातील ४ महिलांवर सामूहिक बलात्कार करून या कुटुंबातील प्रमुखाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, जेवरचे राहणारे शकील कुरैशी यांचा एक नातेवाईक जनपद बुलंदशहरमध्ये एका रुग्णालयात दाखल होता. त्यांना बघण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते. साबौता गावाजवळ ५ जणांच्या टोळक्याने त्यांची कार घेरली. कारच्या टायरला गोळी मारली.

संपूर्ण कुटुंबाला हत्य़ारांचा धाक दाखवून ओलिस ठेवण्यात आलं. शकील कुरैशी यांनी त्यांचा विरोध केला म्हणून त्यांना गोळी घालण्यात आली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ४४ हजार रुपये आणि महिलांचे दागिणे त्यांनी लूटले.
चार महिलांवर सामूहिक बलात्कार
या कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार देखील करण्यात आला. महिलांना मेडिकल टेस्टसाठी पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये संताप आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *