👁 7 Views

सांगोला तालुक्याच्या विकासासाठी निधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे अॅड. शहाजीबापू पाटील यांना आश्वासन

पंढरपूर लाईव्ह, सांगोला

सांगोला :- (सचिन व्हटे)  
सांगोल्यातील दुष्काळ निर्मूलनासाठी रखडलेल्या टेंभू म्हैसाळ योजनांची कामे मार्गी लावणे.उजनीचे उचल पाणी व नीरेच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविनणे, यासह सांगोल्यातील बेरोजगार तरुणांच्या हातांना रोजगाराची निर्मिती व्हावी एम.आय.डी.सी.ची निर्मिती व शहराच्या विकास कामासाठी नगरपालिकेस वेगवेगळ्या योजनेतून निधी द्यावा या प्रमुख मागण्या केल्या आहेत.

या संदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन अॅड. शहाजीबापू पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी सकाळी १०.३० वा सांगोल्यात आगमन झाले. ते हेलिपॅडवरुन थेट .मा.आ.अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाटील कुटूंबाच्या वतीने मा.जि.प.सदस्या वृषाली पाटील यांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी सुभाषनाना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री ना.सुभाष देशमुख, आ.प्रशांत परिचारक, मा.आ.अॅड. शहाजीबापू पाटील, माजी.आ.राजा राऊत, गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर, विजयराज डोंगरे, नगराध्यक्षा राणीताई आंनदा माने, मा.नगराध्यक्ष रफीक नदाफ, संजय मेटकरी, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चहापाण्यानंतर मा.आ.अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या समवेत सुमारे अर्धा तास चर्चा केली. बैठकीतील चर्चेचा विषय हाच होता की सांगोल्यातील अपुऱ्या सिंचन योजना मार्गी लावणे या प्रमुख मागणीवरच नजीकच्या काळात मा.आ.अॅड. शहाजीबापू पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नियोजित दौरा मानेगांव कडे रवाना झाले

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *