पंढरपूर-गोपाळपूर रोडवरील डोंगराच्या वाड्यात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका जेष्ठ इसमाने आज आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पंढरपूर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी ७ वाजणेपुर्वी पंढरपूर-गोपाळपूर रोडवरील डोंगराच्या वाड्यातील अंबाबाई मंदिराजवळच्या लिंबाच्या झाडाला अज्ञात जेष्ठ इसमाने (वय ५५ ते ६०) गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची खबर विनोद विष्णु ननवरे, रा. संभाजी चौक, पंढरपूर यांनी शहर पोलिसांना दिली. शहर पोलीस ठाणेत अकस्मात मयत म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास पोसई गोसावी हे करीत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!