25 मे : मुंबईतल्या पीआय ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली गणोरेंच्या हत्येचं गुढ अखेर उकललंय. मुलगा सिद्धांतच आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिलीये.
दीपालींच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सिद्धांत याला जोधपूरमध्ये अटक करण्यात आलीये. दीपालींच्या हत्येनंतर सिद्धांत गायब होता. पोलिसांनी जोधपूर रेल्वे स्टेशनजवळच्या एका हॉटेलमधून त्याला अटक केलीये.
दीपाली आणि ज्ञानेश्वर सतत भांडायचे, शिवाय दीपाली त्याला वाईट वागणूक देत असल्याचं सिद्धांतचं म्हणणं आहे. मंगळवारी दीपाली यांनी सिद्धांतजवळ त्याचं प्रगती पुस्तक मागितलं. सिद्धांतनं परीक्षाच दिली नव्हती. त्यामुळे त्याच्याकडं प्रगती पुस्तकच नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सिद्धांतनं दीपालीची हत्या केली.
Posted inCrime
होय, ‘मी आईला मारलं!’, पीआय ज्ञानेश्वर गणोरेंच्या मुलाची कबुली
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





