ग्रेटर नोएडा, जेवर
जेवर-बुलंदशहर मार्गावर घडलेली चार महिलांवरील सामूहिक बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी होती. पीडित महिलांनी घडलेली अत्याचाराची घटना कथन केली आणि सर्वांना हादराच बसला.
दरोडेखोरांनी या घटनेत दागिने आणि पैसे लुटलेच पण महिलांनी हात जोडून, पाया पडून सोडून देण्याची मागणी केली. मात्र या नराधमांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढचं नव्हे तर चौघांमधील एका ५० वर्षाच्या महिलेलाही त्या सैतानांनी सोडले नाही.
सर्व दागिने पैसे घ्या पण आम्हाला सोडा, असं पीडित महिला दरोडखोरांना कळवळून सांगत होत्या. यात ५० वर्षाची महिलाही. ‘मी तुमच्या आई सारखी आहे, आम्हाला सोडा’, अशी ती सतत याचना करत होती. पण त्या नराधमांना दया आली नाही. त्यांनी तिच्यावरही सामूहिक बलात्कार केला.
Posted inCrime





