👁 12 Views

मालेगाव महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर

मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
कलांनुसार 84 जागांच्या महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीचा क्रमांक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 26 जागांवर आघाडी मिळाली आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांनी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनेचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत.
मात्र भाजपचं मुस्लीम कार्ड सपशेल अपयशी ठरलं आहे. मालेगाव महापालिकेत भाजपचे केवळ तीनच उमेदवार आघाडीवर आहेत. याशिवाय इतरांच्या खात्यात दोन जागा गेल्या आहेत.
21 प्रभागातून 84 उमेदवार महापालिकेवर निवडून जाणार आहेत. गेल्या वर्षी काँग्रेस आणि तिसरा महाज एकत्रित यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि जनता दलाची युती झाली असून तिसरा महाज राष्ट्रवादीसोबत लढत आहेत. तर काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, काहीही झालं तरी राष्ट्रवादी-जनता दल युती काँग्रेससोबत युती करणार नाही, असं जनता दलाचे नेते बुलंद इकबाल निहाल अहमद यांनी सांगितलं. तसंच मनपात जनता दल-राष्ट्रवादी युतीच सर्वात मोठा पक्ष असेल. महापौरही आमचाच होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जनता दलाच्या या पवित्र्यामुळे शिवसेना, एमआयएम, भाजपचा भाव वधारणार आहे.
मालेगाव महापालिका  : 84 जागा  (आतापर्यंतचा निकाल/आघाडी)
मॅजिक फिगर : 43
पक्ष                       जागा
काँग्रेस                    28
राष्ट्रवादी                26
शिवसेना                 11
एमआयएम            07
भाजप                    03
इतर                      01
LIVE UPDATE:  प्रभाग क्रमांक 18 ड मध्ये  काँग्रेसचे इसराईल खान ईस्माइल खान विजयी


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *