26 मे : लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी एक तरुण पुढं धावल्याचं समोर आलंय. इरफान शेख असं या तरुणाचं नाव आहे. हेलिपॅडजवळच इरफानचं भंगारचं दुकान आहे.
ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळी सगळेच विरुद्ध दिशेला पळत सुटले. अगदी पोलीसही स्फोट होईल या भीतीनं मागं झाले. पण राजा संकटात सापडलाय असं म्हणत इरफाननं हेलिकॉप्टर जिथं पडलं तिथं धाव घेतली. हेलिकॉप्टरचा दरवाजा जोरात ओढला. मुख्यमंत्र्यांनी बाहेर येत आपण ठीक असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं इतरांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. इरफानच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर
आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





