सांगोला
सचिन व्हटे
मुक्ताई मंगल कार्यालयात शिवणे ता. सांगोला येथे दि. २८/ २९ व ३० मे रोजी राज्यस्तरीय निवासी शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराचे उद् घाटन शेतकरी नेते मा.श्री. रघुनाथ दादा पाटील यांचे उपस्थित होणार असुन मा.श्री. विश्वंभर काशिद जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ यांच्या शुभहस्ते उदघाटन होणार आहे. शिबीरात तमाम जनतेच्या विविध समस्या प्रश्नांवर सखोल मार्गदर्शन व परिसंवाद करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत प्रख्यात विचारवंत वक्ते बाहेरून येणार आहेत. या शिबीराचा समारोप आक्रमक आमदार बच्चु कडु हे करणार आहेत. संपूर्ण शिबीर हे मोफत असुन जेवणाचीही सोय आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार व शेतकरी संघटने तर्फे करण्यात येत आहे.
..




