नवी दिल्ली, दि. 28 – बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठीhttp://www.cbseresults.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख सोमवार, २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज फक्त ऑनलाइन निकाल जाहीर होईल. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी निकालाच्या प्रतीसाठी बोर्डाच्या कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन सीबीएसई बोर्डातर्फे करण्यात आले आहे. यंदा देशभरातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला10 लाख 98 हजार 420 विद्यार्थी बसले होते. 3 हजार 503 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
रिझल्ट कसा पाहाल?
त्यानंतर ‘CBSE 12th Result 2017’ या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरा.
‘सबमिट’वर क्लिक करा. त्यानंतर रिझल्ट ओपन होईल.




