👁 9 Views

अखेर दुष्काळी भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली.



आ. भालकेंनी जनतेचा आमदार हि बिरुदावली ठरवली सार्थ


भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील गोणेवाडी झोन मधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या गावांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता तो आमदार भारत भालके यांच्या सततच्या प्रयत्नामुळे तो आता मिटला आहे.तरीही २८ गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप बाकी असुन तेही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सुचना आमदार भालके यांनी उपस्थितीत असलेल्या जनसमुदायासमोर संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना दिल्या. व अधिकार्‍यांनीही नजिकच्या काळात हि योजना युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. आमदार भालके यांच्या कार्य तत्पर व कर्तव्य दक्ष शैलीला लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.या योजनेमुळे सतत पाण्याच्या विवेचनात असणाऱ्या माय माऊलीला खुप मोठा दिलासा मिळणार असुन त्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता थांबेल.आमदार भारत भालके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हि योजना अतिशय गतीमानतेने पूर्णत्वाकडे जात आहे.त्यामुळे आमदार भालके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीवर एक दृष्टीक्षेप ह्या योजनेला ११ जुलै २०१४ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली.त्यानंतर भौतिक प्रगतीवर केलेली कामे- शिर्ष कामे -भिमा नदीवर उचेठाण येथील १० मीटर व्यास व १८ मी. खोली जॅकवेल, पंप हाऊस, पुल व कनेक्टिंग पाईपची कामे, जॅकवेल ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत अशुद्ध पाणी उध्दरण नलिका ३५० मि.मी व्यास डीआयके-९ लांबी -३२.६० कि.मी टेस्टिंगसह पुर्ण झाले आहे,त्यानंतर अशुद्ध पाणी पंपींग मशिनरी -२१५ अश्वशक्ती ३ नग, ८.०० द.ल.लि.क्षमतेची कन्वेन्शनल जलशुध्दीकरण केंद्राचे काम ९०% पुर्ण केले आहे.मुख्य संतुलन टाकी गोणेवाडी (२.२ ल.लि), नंदेश्वर झोन (५.०ल.लि)- आर सी सी काम पूर्ण झालेले आहे.भुयार झोन (२.२५ ल.लि.) बाॅटम स्लॅबपर्यंत काम पुर्ण करण्यात आले आहे. गोणेवाडी शुध्द जलदाब नलिका काम पुर्ण. नंदेश्वर झोन जलदाब नलिका ८०% काम पुर्ण झाले आहे. गुरूत्वनलिका -गोणेवाडी झोन -११० ते २२५ मि.मि व्यासाचे एचडीईपी व २५०, ३०० मि.मि. व्यासाचे डीआय के- ७ पाईप लाईन एकुण लांबी -३३.५६ कि.मी सर्व काम पुर्ण केले आहे. नंदेश्वर झोनमधील ११० ते २२५ मि.मि व्यासाचे एचडीईपी व ३५० मि.मी व्यासाचे डीआय के -७ पाईप लाईन एकुण लांबी -६९.२४ कि.मी पैकी ५५ कि.मी काम पुर्ण करण्यात आले आहे. भुयार झोन मधील ११० ते २२५ मि.मि व्यासाचे एचडीईपी व पाईप लाईन एकुण लांबी ५५.३५ कि.मी पैकी ३७ कि.मी काम पुर्ण करण्यात आलेले आहे. उंच साठवण टाक्या खुपसंगी, शिरसी, हाजापुर, नंदेश्वर, सिध्दनकेरी, मानेवाडी, महमदाबाद, लोणार, खवे, पौट, येळगी मारोळी, व शिवनगी येथील उंच टाक्यांचे काम प्रगतीपथावर आहे. व जुन २०१७ अखेर गोणेवाडी झोन मधील टप्प्या टप्प्याने व उर्वरित गावे आॅगस्ट २०१७ अखेर कार्यान्वित करण्यात येणार आहेत अशी माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली.सदर योजना पुर्ण करण्यामध्ये संबंधित अधिकारी कंत्राटदार यांचेही मोलाचे योगदान असुन त्यांच्या कार्यपद्धती बद्दलही जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.विधानभवनामध्ये आम्ही जरी विरोधी बाकावर बसत असु तरी सुद्धा दुष्काळी भागातील जनतेच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना संघर्ष करून निश्चितपणे राबवल्या जातील. अशी ग्वाही यावेळी आमदार भारत भालके यांनी दिली.सदर योजना आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये मंजूर झाली असुन त्याबद्दल त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन पालकमंत्री दिलीप सोपल, व तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणलक्ष्मणराव ढोबळे यांचेही विशेष आभार मानले.सदर कार्यक्रमाच्या वेळी रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा,तहसीलदार प्रदीप शेलार,सांगलीचे अधिक्षक अभियंता एस.एन गरंडे, कार्यकारी अभियंता व्ही.पी.बंडगर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी,नगरसेवक राहुल सावंजी,पंचायत समिती सदस्य नितीन पाटील,दामाजी शुगरचे माजी संचालक मारूती वाकडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील,खडकीचे सरपंच दत्ता लवटे, उपसरपंच जयसिंग रजपूत, सचिन नकाते, गुरूलिंग दोलतडे,दादासाहेब मदने,आप्पासाहेब मेटकरी, ज्ञानेश्वर मेटकरी,कटारे सर,नारायण शिंदे,मायाप्पा गरंडे, अशोक जाधव, संभाजी मस्के व इतर उपस्थितीत होते.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *