👁 6 Views

जूनपासून विद्यापीठाच्या निवडणुका; पहिल्या आठवड्यात मतदार याद्यांचे पुनर्गठणाची होणार

औरंगाबाद- मार्च २०१७ पासून महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्ट-२०१६ लागू झाला आहे. या नव्या कायद्यान्वये ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत विद्यापीठीय अधिकार मंडळे अस्तित्वात येणे क्रमप्राप्त आहे. मुंबईपाठोपाठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मतदार याद्यांच्या पुनर्गठनासाठी अधिसूचना काढण्यात येईल, अशी शक्यता आहे.

येथील विद्यापीठातील निर्वाचित सदस्यांच्या अधिकार मंडळांची मुदत ३१ ऑगस्ट २०१५ रोजी संपुष्टात आली होती. त्यानंतर आतापर्यंत पदसिद्ध सदस्यांची अधिकार मंडळे अस्तित्वात होती. आता नवा कायदा लागू झाला असून डॉ. आर. एस. माळी समितीने सुचवलेले निवडणुकांचे समान परिनियमदेखील महाराष्ट्र राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले.

मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाने मतदार याद्या नूतनीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अगदी तोच कित्ता येथील विद्यापीठानेही गिरवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी दोन वेळा बैठका घेण्यात आल्या. सोमवारी, बुधवारी प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रदीप जब्देंनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. पीएचडी विभागाचे कामकाज सांभाळणारे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांना निवडणूक विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे त्यांनी ठरवले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या 

व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *