पंढरपूर : आज परिस्थिती पाहीली तर प्रत्येक पातळीवर सरकार आणि प्रशासनाकडुन शेतकर्यांवर अन्याय होतो आहे. शेती मालाला हमी भाव मिळत नाही. तर अर्थीक संकटामुळे शेतकर्यांना अत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही. हि सर्व परिस्थिती पाहता राज्यातील शेतकर्यांनी 1 जून पासुन बेमुदत संपावर जाण्याचा एल्गार केला असून यामध्ये राज्यातील सर्व शेतकर्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे शेतकरी संपाबाबत विचारमंथन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक‘मासाठी शिवाजी नांदखिले, पुणे. कालिदास आपेट, बीड. शंकर गायकवाड, बार्शी. यानी मार्गदर्शन करून शेतकर्यांना संपामध्ये सहभागी होण्याचे अवाहन केले. याप्रसंगी अरूण भोसले, सुखदेव भोसले, सुभाष कदम, मधुकर गुंजाळ, शिवाजी बिस्कीटे, मोहन बिस्कीटे, महादेव रोकडे, बापू रोकडे, नवनाथ गुंजाळ, शिवाजी जाधव, सागर कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले कि, स्वामीनाथन आयोग लागु झाल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. आज शेतकर्यांना रेडीरेकनरच्या धर्तीवर कर्जपुरवठा झाला पाहीजे. तर ऊसाचा हमी भाव वाढल्याचा गवगवाट केला जात असला तरी या भागातील शेतकर्यांना उत्तर प्रदेश व इतर राज्यांपेक्षा कमीच दर मिळणार आहे. तर त्या पट्टीमध्ये दर मिळावा यासाठीही शेतकरी संघटनेच्यावतीने प्रयत्न सुरू आहे. काँग‘ेस , राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षाचे शेतकर्यांवर असलेल्या खोट्या प्रेमापोटी वेगवेगळ्या यात्रा काढीत असून विधानसभेच्या बाहेर देखावा करीत आहेत. खरचं यांना कर्जमाङ्ग ी शेतकर्यांना द्यावी असे वाटत असते तर त्यांनी विधानसभेत तो ठरावा माडुन सं‘याबळाच्या जोरावर पास करूनही घेतला असता असे यावेळी सांगितले.
यावेळी संपामध्ये सहभागी होण्याचा उपस्थित शेतकर्यांचा ठराव पास करण्यात आला. कार्यक‘माचे आयोजक संभाजी पवार यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये शेतकर्यांनी कोणत्याही अडचणी संदर्भात कोणाच्याही दावणीला न जाता संघटनेकडे सहकार्य मागावे त्यास संघटना समर्थपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले. यावेळी रोपळे परिसरतील शेतकरी उपस्थित होते

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111