👁 9 Views

सोलापूर विद्यापिठास अहिल्यादेवींचे नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-ना.राम शिंदे

*धनगर आरक्षणाचा प्रश्‍न लवकरच निकाली*

सोलापूर विद्यापिठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबत लवकरच शासनस्तरावर निर्णय अपेक्षीत असून त्याच बरोबर धनगर समाजास अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाबाबत राष्ट्रिय आयोगाकडे शासनाने अनेक महत्वपुर्ण संदर्भासहीत पाठपुरावा केला आहे.त्याबाबतही लवकरच निर्णय अपेक्षीत आहे.पंढरपूर या तिर्थक्षेत्राचे महत्व लक्षात घेवुन अहिल्यादेवींनी या क्षेत्राचा अडिचशे वर्षापुर्वी विकास केला.आता आम्ही पुढाकार घेवुन पंढरपुरात अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणार आहोत असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राम शिंदे यांनी केले आहे.येथील छत्रपती शिवाजी चौक येथे मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.भारत भालके,आ.प्रशांत परिचारक,नगराध्या साधना भोसले,उत्तम जानकर,मोहोळ पंचायत समितीचे सभापती समता गावडे,पंढरपूर पंचायत समिती सभापती दिनकर नाईकनवरे,विठ्ठल कारखान्याचे संचालक मोहन कोळेकर,समाधान काळे,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक भारत कोळेकर,बाळासाहेब गडदे पाटील,पंचायत समितीचे मा.सभापती ऍड.वामनराव माने,जि.प.सदस्य प्रा.सुभाष माने,रामदास ढोणे,युवराज दगडे,पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोटे,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक,जि.प.बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे,पंडीत शेंबडे आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना आ.भारत भालके म्हणाले की,राजमाता अहिल्यादेवींनी देशातील अनेक धार्मिक स्थळांचा जिर्णोध्दार केला तर पंढरपूरातही चंद्रभागा नदीवर घाट बांधले,पखालपूर येथे भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बांधली.त्याकाळी त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू या आजही बांधकाम क्षेत्रासमोर एक आदर्श उदाहरण आहे.250 वर्षानंतरही या बांधकांना साधा तडा सुध्दा गेलेले दिसून येत नाही.धनगर समाज हा डोंगरदर्‍यातून भटकत आपली उपजिवीका करीत आलेला समाज आहे.या समाजाला घटनात्मक आरक्षण मिळणे गरजेचे आहे.देशातील अनेक राज्यात या समाजास अनुसुचीत जमातीचे आरक्षण असताना आपल्याकडे मात्र अन्याय होत आहे.या समाजास तातडीने आरक्षणाचा हक्क दिला पाहीजे असे प्रतिपादन यावेळी आ.भारत भालके यांनी केले. 
    यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले की,अहिल्यादेवी या भक्ती आणि शक्तीच्या प्रतिक आहेत.आपल्या हाती असलेल्या सत्तेचा उपयोग सर्वसमान्य लोकांच्या सेवेसाठी करण्याचा आदर्श आज त्यांनी आपणा सर्वांसमोर ठेवला आहे.त्यांच्या कार्याची दखल आंतराष्ट्रिय विद्यापिठांनी घेतली असून अनेक विद्यापिठात त्यांच्या जिवनकार्याचा आभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.धनगर समाजास आरक्षण मिळण्यासाठी तातडीने निणर्य घेतला जावा अशीही अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. 
    यावेळी मोहोळ पंचायत समितीच्या सभापती समता गावडे,युवा गर्जनेचे अध्यक्ष समाधान काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष सिताराम कोळेकर,उपाध्यक्ष संजय माने,सुरेश ढोणे,कार्याध्यक्ष राहुल हाके,स्वागताध्यक्ष माऊली हळणवर,संतोष सुळे,बाबा लगसकर,खजिनदार अजय खांडेकर,आण्णा सलगर,सोमा ढोणे,सचिव गोरख पांढरे,वैभव आलदर,बालाजी पाटील,मिरवणूक प्रमुख रायप्पा हळणवर,संतोष बंडगर,प्रशांत घोडके,तानाजी गोफणे,संभाजी शिंदे यांचासह अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास धनगर समाजाचे पंढरपूर शहर व तालुक्यातील समाज बांधव मोठय संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय खांडेकर यांनी केले तर शेवटी आभार ऍड.वामनराव माने यांनी मानले. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *