👁 5 Views

पुणे – सोलापूर महामार्गावर ट्रकवर आदळून वाहनचालकाचा मृत्यू

 

पुणे: ट्रकवर आदळून मालवाहू पिकअप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर लोणीकाळभोर परिसरात घडली.


महादेव वामन जोगदंड (वय २७, सध्या रा.

सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. वडगाव, ता.


निलंगा, जि. लातूर) असे मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. पिकअपचालक जोगदंड पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाला होता. 

लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्ती परिसरात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून ट्रकला धडक दिली. 


अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोगदंड याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *