👁 5 Views

नागाणे फणा काढताच मुंगुसाची झाली हवा टाईट ……

 

सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणजे नाग साप. नागासोबत पंगा घेणे माणसांच्याही जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नागाने फणा काढला की भल्या भल्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.


एका मुंगूसानेही नागाशी पंगा घेतल्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. मुंगूस नागासमोर गेल्यावर दोघांमध्ये जोरदार फाईट झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 


मुंगूसाने नागावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नागानेही पलटवार करुन मुंगूसाची हवा टाईट केली. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


एक मुंगूस नागाच्या जवळ जाऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण मुंगूसाला पाहिल्यावर नागही पिसाळतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. नाग आणि मुंगुसाचा रंगलेला हा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नागाने फणा काढताच मुंगूस चार हात लांब झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. नागाच्या दंशपासून वाचवण्यासाठी मुंगुस दोन पाऊल मागे टाकतो. पण पुन्हा तो नागावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. नागाने मुंगूसाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंगूसाने नागाला घाबरुन पळ काढला. त्यानंतर नागही मुंगुसावर हल्ला करणे थांबवतो आणि त्याठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न करतो.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *