मुंबई, दि. 5 : जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी सर्वांनीचप्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आजयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित जागतिक पर्यावरण दिनकार्यक्रमात बोलत होते.
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुख्य सचिव सुमितमल्लिक, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन, आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एकीकडे आपण विकासकरतोय पण त्याच बरोबर पर्यावरणाची हानी होते. हे प्रत्येकाने लक्षातघेतले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. शासनाने50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी 4कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जल, जमीन आणि जंगलालाआपल्या पुर्वजांनी ईश्वराचा दर्जा दिला आहे. या तिन्ही गोष्टी नष्टझाल्यातर कुणीही जगू शकणार नाही. जगाला एका सुत्रात बांधुनएकात्मता टिकविणे हा सृष्टीच्या सुत्राचा भाग आहे. ते सुत्र आपल्यापुर्वजांना चांगले समजले होते. अलिकडच्या काही वर्षात पावसाचे प्रमाणकमी झाले आहे. तो कधी खुप पडतो, तर कुठे पडत नाही. त्यामुळे पीकांचेमोठ्याप्रमाणात नुकसान होते. या पाठीमागे पर्यावरणाचे संतुलनबिघडणे, हेच मुख्य कारण आहे. पुर्वी गावा–गावात नदी–नाले, तलाव, छोटेबंधारे असायचे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नव्हता. अलिकडच्या काळात हेसर्व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आपण नष्ट केले. पाणलोटाचे नुकसान केले.त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणूनशासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरु केली. त्यामुळे पाणीसाठावाढला, शेकडो गावांना पाणी मिळाले. लातूर जिल्ह्यात आज एकही टँकरलागत नाही. हे जलयुक्त शिवारचे यश आहे. `माती, गाळ काढा आणिशेतात टाका` हा कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातील 54 हजारतलावातील गाळ काढून शेतात टाकणार आहोत. त्यामुळे शेती सुपीकहोऊन भरघोस उत्पादन वाढेल, असे सांगून ते शेवटी म्हणाले की,उद्योगांनीही पर्यावरणपुरक उद्योग सुरु केले पाहिजेत. कार्बन कमीकरण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
पर्यावरण मंत्री श्री. कदम म्हणाले की, प्रदुषण हा जगभरातभेडसवणारा प्रश्न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटचीघरे झाली, पावसाचे प्रमाणही कमी झाले, हवेत कार्बन वाढले याचापरिणाम पर्यावरण ऱ्हासात झाला. गेल्या दोन वर्षापासून वनविभागासोबत 50 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे.प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र ही मोहिम सुरु आहे. प्रत्येकाने किमान 10 झाडेलावून ती जगवली पाहिजे.
मुख्य सचिव श्री. मल्लिक यावेळी म्हणाले की, आपल्याकडेसमुद्राच्या तापमानावर पाऊस अवलंबून असतो. 90 दिवस पाऊस येतो.तो पुरेसा नाही. त्यासाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे.पाण्याची बचत केली पाहिजे. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीचे उत्पादनवाढले आहे. प्रत्येक गावाने पाण्याचे स्त्रोत निर्माण करुन पाण्याचा प्रश्नसोडविला पाहिजे. शहरातून सोलर एनर्जीचा वापर वाढला पाहिजे.प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे यायला हवे.
प्रारंभी पर्यावरणावरील माहितीपट दाखविण्यात आला.डॉ.अनबलगन यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनाचे महत्वस्पष्ट केले. त्यानंतर पर्यावरणाचा संदेश असलेल्या एम.टी.एन.एल. च्याबिलाचे, हवा गुणवत्ता अहवाल पुस्तिकेचे, ब्रेन लिपीतील पर्यावरणपुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यातआले. तसेच वसुंधरा पुरस्कार-2017, पर्यावरण वसुंधरा लघु चित्रपटस्पर्धा विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. जलसंवर्धन केलेल्या गावांनापारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पर्यावरणपुरस्कारप्राप्त नागरीक, संस्थांचे प्रतिनिधी, अंध मुले, पर्यावरणप्रेमीनागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार वितरण
जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यात पर्यावरणाचे संवर्धन करणा-या विविध संघटना आणि संस्थाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वसुंधरा पुरस्कार 2017 चे प्रथम पारितोषिकाचे रेमंड युको डेनिम प्रा.लि. लेाहार, जिल्हा यवतमाळ हे मानकरी ठरले. तर द्वितीय गॉडफ्रे फिलीप्स इंडिया लिमीटेड, नवी मुंबई आणि जॉन डिअर इंडिया प्रा.लि. पुणे हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि दिड लाख रोख प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह असे आहे.
वृक्ष लागवड आणि संगोपनाकरीता विशेष गौरव म्हणून मे.पाल फॅशन प्रा.लि., एम.आय.डी.सी. बोईसर यांना 17 हजार वृक्ष लागवडीकरिता विशेष पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.
वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा 2017 या स्पर्धेत हौशी गटातून प्रथम पारितोषिक ‘ॲन्ड द बर्डस स्टार्टेड चिर्पिंग अनेन’-इंडियन ग्रामिण सर्व्हिसेस, आणि द्वितीय पारितोषिक मिलींद रणदिवे यांचे ‘पश्चिमा’ तर एससीएम सोफिया कॉलेजचा ‘सेव द स्पॅरो’ या लघुचित्रपटास तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. अनुक्रमे एक लाख, 75 हजार आणि 50 हजार, प्रशस्तीपत्रक आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उत्कृष्ट दर्जाचे इसी पोर्टल विकसित केल्याबद्दल महाराष्ट प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहायक यंत्रणा अधिकारी दिनेश सोनावणे, वेबवर्क्स इंडिया प्रा.लिमीटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर तुषार चोपडे, वेबवर्क्स इंडिया प्रा. लिमीटेडचे सिनीअर डेवलपर सयान पाल यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व वनराई पुणे जलसंवर्धन पंचायत अंतर्गत नाशिक येथील मुळेगाव, जालना येथील बाजार वाहेगाव,रायगड येथील दांडगुरी या गावांचा गौरव करण्यात आला.






