👁 9 Views

शेतकर्‍यांनी अ‍ॅडीशनल डीपीसाठी महावितरण कंपनीकडे मागणी करावी -आ. भारतनाना भालके

Pandharpur Live 5 jun 2017


पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यामध्ये महावितरण आपल्या दारी या योजनेअंतर्गत ज्या शेतकर्‍यांनी वीज कनेक्शनची मागणी केली होती.त्या शेतकर्‍यांची वीजेची कामे करण्यासाठी पायाभुत सुविधा योजनेअंतर्गत 12 कोटीच्या निधी उपल्बधतेसाठी  उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.तसेच जादा लोड असणार्‍या डीपी वर शेतकर्‍यांनी अ‍ॅडीशनल डीपीसाठी शेतकर्‍यांनी महावितरण कंपनीकडे मागणी करावी असे आवाहन आ.भारत भालके यांनी केले आहे.

        दि.30 रोजी आ.भारत भालके यांनी उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासमवेत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील विजेच्या समस्याबाबत बैठक घेतली होती.यावेळी उर्जामत्र्यांनी व्हिडिओ कॉन्परन्सव्दारे जिल्ह्यातील अधिकार्‍यांना कामे पुर्ण करण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या.त्या अनुशगांने आज दि.5 रोजी पंढरपूर येथील डाक बंगला येथे पंढरपूर-मंगळवेढा  मतदार संघातील विजेच्या समस्या संदर्भात महावितरण कंपनीच्या आधिकार्‍यासमवेत आ.भालके यांनी आढावा बैठक घेतली होती.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्य अभियंता नागन्नाथ इरवाडकर,अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर,अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) हिवरे, कार्यकारी अभियंता संदीप सानप,अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार सोलनकर,महापारेषणचे कार्यकारी अभियंता दत्तू आदी उपस्थित होते.यावेळी जळालेले डीपी चार दिवसांत देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे इरवाडकर यांनी सांगतिले,डीपी जळाल्यानंतर तात्काळ कंपनीच्या अधिकार्‍याकडुन पंचनामा करून कंपनीच्या वाहनाने शेतकर्‍यांना डीपीची नेआण केली जाईल.तसेच शेतकर्‍यांने भाड्याच्या डीपी नेल्यास त्यांना कंपनीकडुन भाडे अदा केली जाईल.तसेच शेतकर्‍यांनी डीपीचे ऑईल,कटआऊट,केबल आदी साहित्य महावितरण कंपनीच्या खर्चाने बदलुन दिले जाईल.तसेच यावेळी शेतकर्‍याच्या मागणीप्रमाणे जुन्या तारा,पडलेले पोल मागणीप्रमाणे बदलुन देणेबाबत आ.भालकेनी सुचना दिल्या.
  डीपीची क्षमता मागणीप्रमाणे शेतकर्‍यांना वाढवून दिली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी आ.भालके म्हणाले,शिरनांदगी,सोड्डी,नंदेश्‍वर,खोमनाळ या भागातील अतिरिक्त डीपी चार दिवसात चालु करून दिले जाणार आहेत.तालुक्यातील अर्धवट स्थितीतील डीपीची व पोलची कामे महिनाअखेर पर्यंत पुर्ण होणार आहे.ब्रम्हपुरी, माचणुर या दरम्यानचे 11 के.व्हीचे डबल सर्किट काही दिवसांत पुर्ण होणार आहे.तसेच 164 घरगुती व व्यापारी वीज जोडण्यासाठी डीपीडीशी मधून 2017-18 सालासाठी 28.41 लाखाचा निधी मंजूर झाला असुन याची कामे दोन महिन्यात पुर्ण होतील.तसेच द्रारिद्रय रेषेखालील 165 घरकुलाना विज कनेक्शन देण्यासाठी 29 लाख मंजूर असुन याची टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असुन एका महिन्यात ही कामे पुर्ण होतील.तळसंगी येथील 33 के,व्ही उपकेंद्राच्या जागेबाबत जिल्हाधिकार्‍यांनी केंद्राच्या योजनेतून निधीबाबत चर्चा केली होती.परतू या प्रक्रियेस जादा वेळ लागणार असल्याने अधिक्षक अभियंता अखत्यारित 20 लाखाचा खर्च करून महावितरण कडुन जागा खरेदी केली जाणार याबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या परवागीने,उपजिल्हाधिकारी रेळेकर यांच्याशी चर्चा झाली असुन याबाबत जागा खरेदीची चार दिवसांत लेखी परवागी घेवून काम सुरू केले जाणार आहे. मंगळवेढा येथील भाळवणी येथील 132 केव्हीचे वीजकेंद्र जुलै अखेर करण्यात येणार आहे तसेच सिध्दापूर,तामदर्डी,अरळी,नंदूर या भागातील विजेची मागणी पाहता या परिसरात नवीन उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.तसेच तनाळी येथील 33 के.व्हीचे उपकेंद्र दोन महिन्यात सुरू होणार असल्याचे आ.भारत भालके यांनी सांगतिले.यावेळी तालुक्यातील महावितरण कंपनीच्या माध्यमातुन विजेची कामे मार्गी लागण्यासाठी व शेतकर्‍यांच्या अडचणी दुर करण्यासाठी लागणार्‍या निधीबाबात उर्जामंत्र्याशी पाठपुरावा सुरू असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगतिले. यावेळी मुख्य अभियंता नागन्नाथ इरवाडकर,अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर,अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) हिवरे, कार्यकारी अभियंता संदीप सानप,अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार सोलनकर,महापारेषणचे कार्यकारी अभियंता दत्तू , सहाय्यक कार्यकारी अभियंता शिंदक, पंढरपूर ग्रामीणचे मिसाळ व इन्प्राचे आधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *