👁 10 Views

शेतकऱ्यांच्या संपात गेल्या 6 दिवसांत 278 कोटींचं नुकसान

07 जून : शेतकऱ्यांच्या संपामुळे गेल्या 6 दिवसात सरासरी 278 क़टीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारतर्फे नुकसानीचा नेमका आढावा अद्याप घेतला गेलेला नाही, मात्र मार्केट यार्ड आणि खूल्या बाजारात मिळून सरासरी एवढं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात 100 कोटीपेक्षा जास्त म्हणजे सर्वाधिक नुकसान झालं आहे.
इतिहासात पहिल्यांदा राज्यातील शेतकरी 1 जून रोजी संपावर गेला. पण या संपाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांनाच बसला आहे. भाजीपाला-फळं यासराख्या शेतमाल बाजार समित्यांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे हा शेतमाल एकतर शेतात, शेतकऱ्यांच्या घरात किंवा गोडाऊनमध्ये पडून आहे. यामध्ये शतकऱ्यांचं सुमारे 278 कोटींचं नुकसान झालं आहे. अर्थात यामध्ये रस्त्यावर केलेल्या नासधूसीच्या नुकसानीचाही समावेश आहे.
सरकारने काहीही दावा केला तरी, राज्यातल्या 307 बाजार समित्यांपैकी काही अपवाद वगळता जवळपास सर्व समित्यांमध्ये शेतमाल नेहमीप्रमाणे पोहचला नाही, यातून नुकसानीची सरासरी समोर आली आहे.
गेल्या 6 दिवसात नाशिकमध्ये दररोज सुमारे 20 कोटींची उलाढाल होते, म्हणजे- सरासरी सर्वाधिक 100 ते 120 कोटीचं नुकसान झालं आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात मिळून 80 ते 90 कोटी आणि इतर सर्व बाजार समित्यांचं मिळून सरासरी 80 कोटीचं नुकसान झालं आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *