👁 12 Views

कल्याणमध्ये तरुणीवर अत्याचार

कल्याण

एका तरुणीवर अत्याचार करत तिचे विवस्त्र फोटो तिच्या भावी पतीला पाठवून लग्न मोडल्याची घटना कल्याणमध्ये घडली. अखेर तरुणीने पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडित तरुणी कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहते. महिनाभरापूर्वी नितेश जोशी हा तिच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता तरुणीचे विवस्त्र फोटो काढले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास भाऊ आणि वडिलांना ठार मारेन, अशी त्याने धमकी दिली. त्याचे वडील झंपु जोशी, आई भामा जोशी, भाऊ विनोद जोशी यांनीही तरुणीला धमकी दिली. अत्याचारित तरुणीचे लग्न ठरल्याची कुणकुण लागताच त्यांनी तिचे विवस्त्र फोटो आणि चिठ्ठी होणाऱ्या पतीला पाठवले. यानंतर तरुणीचे लग्न तर मोडलेच, शिवाय तिच्या कुटुंबाचीही बदनामी झाली. या प्रकरणी अखेर तणावातून बाहेर आलेल्या या तरुणीने नितेश आणि त्याच्या घरच्यांना धडा शिकवण्यासाठी खडकपाडा पोलिस ठाणे गाठले. या तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी जोशी कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *