हिंदू ही प्रत्येक भारतीयाची ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने हिंदू असल्याचा गर्व बाळगावा, पण संकोच बाळगू नये, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लखनौ विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘हिंदवी स्वराज्य दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. अहिंसा, अभय आणि सत्य हे हिंदू सनातन संस्कृतीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आदित्यनाथ यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचे उदाहरण दिले. शिकागोमध्ये परिषदेत त्यांना हिंदुत्त्वाबद्दल विचारले असता, मला हिंदू असल्याचा गर्व आहे, असे ते म्हणाले होते, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. ‘सत्यम, शिवम…सुंदरम्…’ हा हिंदुत्त्वाचा मूळ हेतू आहे. हिंदू ही सत्याच्या सागरातील अमृत रसधारा आहे. तसेच अहिंसा, अभय आणि सत्य हे हिंदू सनातन संस्कृतीचे तीन आधारस्तंभ आहेत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रविरोधी मानसिकतेविरोधात संघर्षासाठी पुढे यावे, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना केले. उपासनेच्या पद्धती बदलल्या असल्या तरी आपले पूर्वज बदलत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते. पण औरंगजेब नाही, असेही आदित्यनाथ म्हणाले. शैक्षणिक संस्थांमधील अशा विकृत मानसिकतेच्या लोकांविरोधात संघर्ष करायला हवा. असेही ते म्हणाले. हिंदू ही प्रत्येक भारतीयाची ओळख आहे. प्रत्येक भारतीयाला हिंदू असल्याचा अभिमान असला पाहिजे. राष्ट्रवादच आपला सिद्धांत आहे. अहिंसा आणि सत्य हे दोन विचार भारतीय संस्कृतीची देणगी आहे, असेही ते म्हणाले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111