👁 5 Views

बायकोवर संशय आला त्याने घरात बोलावलं अन् …. निर्घृण हत्येन नागपुर हादरलं

 

नागपूर: राज्यात काल महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकीकडे राज्यात महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निघृण हत्या केली आहे. ही घटना शहरातील कळंमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मिनीमाता नगरात घडली आहे. लतिका भारद्वाज असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर अमर भारद्वाज असं आरोपी पतीचं नाव आहे.


या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. संशयी स्वभाव घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमर व लतिका भारद्वाज हे दाम्पत्य काही काळापासून नागपूरच्या मिनीमाता नगरात वास्तव्याला होते. अमर भाजीचा ठेला चालवायचा तर मृत लतिका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. त्यांना दोन मुली आहेत.

अमर हा संशयी स्वभावाचा होता. तो आपल्या पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. त्यावरून अनेकदा त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होत होते. वाद विकोपाला गेल्यानं दोघे एकाच घरात पण वेगवेगळे राहत होते.


तरुण घरी आल्याचा राग काही कामानिमित्त एक तरुण लतिकाच्या घरी आला होता. अमरने त्याला विरोध केला. यावरून अमर व लतिकाचा वाद झाला. वाद इतका वाढला की अमरने लतिकाला घरात बोलवून तिच्यासोबत कडाक्याचे भांडण केले व तिच्या डोक्यात हातोड्याने वार केला.

या घटनेत लतिका गंभीर जखमी झाली. तिचा घरातच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *