👁 3 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “जागतिक महिला दिन”विविध उपक्रमानी साजरा

 डॉ.संगीता पाटील यांचे विशेष मार्गदर्शन.

 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयामध्ये दिनांक ८ मार्च २०२३ रोजी “जागतिक महिला दिन” विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. पंढरपूर मधील प्रसिद्ध डॉक्टर व समुपदेशक सौ. संगीता पाटील यांनी विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले. कर्मयोगीच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. संगीता पाटील यांनी संगितले की, आजच्या युगातील महिला चूल-मूल सांभाळत नोकरी ही करीत आहेत. खेळ, राजकारण, संरक्षण याक्षेत्रामद्धे ही स्त्रिया उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत काही क्षेत्रामद्धे स्त्रिया इतरांपेक्षा वरचढ ठरत  असल्या तरी समाजाची वृद्धी होण्यासाठी महिला वर्ग अजून प्रगत होण्याची गरज आहे. तसेच वाढत्या कौटुंबिक जबाबदर्‍यांमुळे महिला स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तसे न करता त्यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळून योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशन यांचे नियमित अवलंबन केले पाहिजे असेही त्यांनी संगितले.


याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस पी पाटील म्हणाले की कामातील समर्पण, तल्लख बुद्धी, शिस्त आणि इच्छाशक्ती यात आपण स्त्रियांशी कधीच बरोबरी करू शकत नाही. स्त्रियांमध्ये संकटाशी लढण्याची आणि राखेतून विश्व निर्माण करण्याची असामान्य हिम्मत आणि ताकद असते. या जगात पोलादाहून मजबूत आणि मेण्याहून मऊ जर काही असेल तर ती स्त्री आहे. घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करण्यार्‍या तमाम सावित्रीच्या लेकीना आपण समाजामध्ये नेहमीच आदराचे स्थान दिले पाहजे असे मत प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी व्यक्त केले. 

महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामधील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री सालविठ्ठल, औदुंबर नरुटे व सागर लिगाडे यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे महिला दिना निमित्त विद्यार्थ्याससाठी निबंध स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सादिक जातगार यांचा प्रथम, कल्याणी घाडगे यांचा द्वितीय तर सिमरन नाईक व ऋतुजा कोळेकर यांचा तृतीय क्रमांक आला. विजेत्या विद्यार्थ्यांना परितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 


श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख, प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रणजीत भोसले, प्रा. दीप्ती कुलकर्णी, प्रा वैष्णवी थोरात, प्रा.दीपाली राजगुरू, प्रा. दिशा करटे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी व प्रांजली गपट या विद्यार्थिनी केले तसेच प्रा. दीप्ती कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *