👁 9 Views

साकारले, स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील विश्वशांती विद्यापीठ -(डॉ. विश्‍वनाथ कराड एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी)



ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मूळ मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीवर

आपले उच्च शिक्षण आजही उभे आहे. या शिक्षण पद्धतीवर अनेक वेळा

अशी टीका होते की, केवळ युवकांना शिक्षित करणारी, पढत विद्वान निर्माण

करणारी, कौशल्याची जोड नसणारी, चारित्र्यसंवर्धन तर मुळीच नाही, शिवाय

भारतीय संस्कृती आणि भारतीय अस्मितेचा मूळ गाभा हरवून बसलेल्या

शिक्षण पध्दतीला आजपयरत पर्याय मात्र कुणी दिला नाही. अशावेळी गेली

30 ते 35 वर्षे आपल्या एम.आय.टी. शिक्षण संस्थेत प्रा. डॉ. विश्वनाथ

कराड यांनी भारताचे थोर सुपूत्र स्वामी विवेकानंद यांचे विचार सतत

रूजविले आणि त्यातून माईर्स एम.आय.टी. कोथरूड, पुणे हे उच्चत्तम

गुणवत्ता शिक्षण संकुल उभे राहिले. या संकुलास नुकतीच महाराष्ट ्र शासनाने

‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’’ म्हणून

मान्यता दिली आहे आणि असे वाटते जणू स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील

विद्यापीठच या परिसरात साकार झाले आहे.

हे विश्वशांती विद्यापीठ म्हणजे विद्याथ्यारच्या सवारगीण शाश्‍वत

शैक्षणिक विकासाची हमीच म्हणावी लागेल. उच्चत्तम गुणवत्ता, यशस्वी

व्यिेमत्व विकास, मूल्याधिष्ठित शिक्षण, सौहार्द आणि शांतीची शिकवण

देणारे भारतातील हे एकमेव ज्ञान विज्ञानाधिष्ठित विद्यापीठ ठरणार आहे.

अमेरीकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशा परड्यु विद्यापीठातील प्राध्यापक, थोर शास्त्रज्ञ डॉ. जय गोरे यांनी

या विद्यापीठाचे कुलगुरूपद स्विकारण्यास संमती दिली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून

दि. 5 जून 2017 रोजी भारताचे मनुष्यबळ विकास मंत्री मा. नामदार प्रकाश जावडेकर यांनी ‘‘प्रा. डॉ.

विश्वनाथ कराड एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’’ च्या परिसरात देशातील ‘‘शाश्वत सवारगीण विकासाची’’

(डउउछ) पहिली मुहूर्तमेढ रोवली हा एक सुवर्णयोगच म्हणावा लागेल. हे विद्यापीठ नेमके कसे असणार

आहे यावर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. एस. एन. पठाण, माजी कुलगुरू, राष्ट ्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर

विद्यापीठ यांनी टाकलेला प्रकाश…………

महाराष्ट ्राची भूमी जशी साधूसंतांची आहे तशी ती थोर समाजसुधारकांची देखील आहे. राजर्षी

शाहू महाराज, महात्मा ङ्गुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव

देशमुख यांनी सामाजिक सुधारणाबरोबरच शिक्षणाचाही आग्रह धरला आणि त्यातून महाराष्ट ्राच्या

शेता-रानांत ज्ञानगंगेचे जे प्रवाह खेळविले गेले व त्या पाण्यावर जी ग्रामीण प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा

नवा ताटवा रूजून आला, त्याच पाण्यावर ङ्गुलून आलेले एक व्यिेमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. विश्वनाथ

विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड

कराड. रामेश्वर (रूई) सारख्या अत्यंत छोट्या गावांतून, बोडिरगच्या शाळेत शिकून ते पुढे एम.ई.

मेकॅनिकल इंजिनिअर झाले आणि पुण्यामधील नामांकित शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात

(उजएझ) प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले.

संस्थेचे दूरदर्शी नेतृत्व

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एक निगर्वी विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक, दूरदर्शी

व्यिेमत्त्व, त्यांनी 1983 साली माईर्स एम.आय.टी. या संस्थेची पुणे येथे स्थापना केली व 1996

साली ‘‘विश्वशांती केंद्रा’’ची स्थापना करून विविध सभा-परिषदांचे देशात व परदेशात आयोजन केले.

डॉ. विश्वनाथ कराड मूळचे हाडाचे वारकरी, त्यांच्या कल्पनेतून आणि तळमळीमधून इंद्रायणी तिरी दगडी

भक्कम घाट बांधले गेले व आळंदी आणि देहू या तिर्थक्षेत्राला ‘‘ज्ञानतिर्थ क्षेत्र’’ म्हणून ओळख

मिळाली. 1998 साली युनोस्कोने त्यांना जगामध्ये शांतीचा प्रसार करण्यासाठी अध्यासन बहाल केले.

सदैव गुणवत्तेचा ध्यास, सर्वच महाविद्यालये/संस्थांना नॅकचे ‘ए’ क्रमाकाचे मूल्यांकन तर सर्व

महाविद्यालय/संस्थांना एन.बी.ए.चे मानांकन लाभलेला हा शैक्षणिक परिसर. सर्व महाविद्यालयांच्या

इमारती, रचना, बांधकाम हे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि चिंतनातून व प्रत्यक्ष

कृतीतून साकार झाल्या आहेत. संस्थेसाठी रात्रंदिन झटणारे असे हे दूरदर्शी नेतृत्व संस्थेला लाभले आहे.

शैक्षणिक वातावरणाचा आदर्श

पुणे शहराच्या पश्चिमेला कोथरूड या उपनगरात हिरव्यागार वृक्षराजींनी नटलेल्या दोन

टेकड्यांच्या कुशीत माईर्स एम2.आय.टी. या शैक्षणिक संस्थेचा परिसर कुणालाही लगेचच मोहित करेल

असा सजलेला आहे. रोमन व भारतीय संस्कृतीची शिल्पकलाकृती सांगणार्‍या भव्य इमारती, रॉयलपाम

ची झालर, लॉन्स आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वागणारे हजारो तरुण-तरुणी. या विद्याथ्यारशी

बोलताना असे जाणवते की, जगप्रसिद्ध एम2.आय2.टी. या संस्थेचेच ते विद्यार्थी आहेत, हा भावार्थ

त्यांच्या चेहर्‍यावरून जणू ओसंडत असतो. प्राचीन वारसाहक्क सांगेल अशा प्रकारची सुंदर दगडी

प्रशासकीय इमारत, त्यावरील घुमट (डोम) आणि त्यापुढे संत ज्ञानेश्वरांची मूर्ती हे एम2. आय2.टी. संस्थेचे

जणू स्थापत्य ब्रँडच झाले आहे. याच प्रशासकीय इमारतीमध्ये प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचे मुख्यालय

आहे.

एका पेक्षा एक सरस महाविद्यालये/संस्था

कोथरूड, पुणे हा माईर्स एम.आय.टी. या शैक्षणिक संस्थेचा मूळ परिसर. या परिसरात

एम.आय.टी हे अभियांत्रिकी महाविद्यालय, अत्यंत गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून संपूर्ण

देशात ओळखले जाते. नंतर त्याच परिसरात एम.आय.टी. सी.ओ.ई. या अभियांत्रिकी महाविद्यालयाची

स्वतंत्र देखणी इमारत, सावित्रीबाई ङ्गुले पॉलिटेक्नीक कॉलेज, व्यवस्थापन शास्त्रामधील चार स्वतंत्र

संस्था, उदा. मिटसॉम, मिटकॉम, मिटसॉब, इ. तसेच ङ्गार्मसी महाविद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान

महाविद्यालय अशी ही सर्व महाविद्यालये/संस्था गुणवत्तेत एकापेक्षा एक सरस असून यातील सर्व

अभ्यासक्रमांना देशपातळीवरून मागणी आहे. या शिवाय उच्च गुणवत्ताधारक प्राध्यापक वर्ग व अत्यंत

शिस्तप्रिय विद्यार्थी ही एम.आय.टी. शिक्षण संस्थेची खरी ताकद आहे. भव्य कमानी, वसतिगृहे,

ग्रंथालय व अतिथीगृह यांच्या सुंदर इमारती आणि प्रशस्त खेळाचे मैदान या परिसराच्या सौंदर्यात अधिक

भर टाकतात.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम व कार्यक्रम

सुरूवातीपासून माईर्स2 एम.आय.टी. संस्था आपल्या अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे व

कार्यक्रमामुळे ओळखली जाते. देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त मा. टी. एन. शेषन यांच्या

पुढाकाराने सुरू झालेले ‘‘स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंट’’ (मिटसॉग) हा अभ्यासक्रम म्हणजे देशातील

राजकारणाचे शुद्धिकरण करण्याची मोहिम म्हणून या संस्थेकडे संपूर्ण देशातून पाहिले जाते. त्याचबरोबर

अखिल भारतीय रोबोकॉन स्पर्धा, भारतीय छात्र संसद, महिला टिचर काँग्रेस या विविध नावीन्यपूर्ण

परिषदांचे या संस्थेतील आयोजन संपूर्ण देशातच वाखाणले गेले आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, उत्साही

युवक/युवती, सतत संशोधनात रमणारा प्राध्यापक वर्ग, सुंदर परिसर, हे सर्व पाहिल्यानंतर एम.आय.टी.

कोथरूड परिसर म्हणजे शिक्षणाची पंढरीच म्हणावे लागेल. या शैक्षणिक वातावरणाला सर्व धर्म

अध्यात्मिक चेहरा लाभला आहे. त्यामुळे या सुंदर लॉनवर कधी कधी इस्लामिक देशातील अनेक मुले

आपला नमाज आदा करतात तर त्याच वेळी मैदानाच्या जवळ असणार्‍या मारुतीच्या मंदिरातून घंटा नाद

निनादतो व कधी कधी वारकरी भजन सुद्धा ऐकू येते. असा संपूर्ण परिसर म्हणजे स्वामी विवेकानंदांना

अभिप्रेत असणारा विज्ञान आणि अध्यात्माचा एकत्र समन्वयच म्हणावा लागेल.

कसे आहे हे विद्यापीठ ?

कोथरूड, पुणे परिसरातील ही सर्व गुणवत्तापूर्ण महाविद्यालये/संस्था आता ‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ

कराड एम. आय. टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’’च्या एकाच छताखाली आलेल्या आहेत. विद्यापीठास

लाभणार्‍या शैक्षणिक स्वायत्ततेचा ङ्गायदा घेऊन या विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या अभियांत्रिकी (बी.टेक.)

विद्याथ्यारसाठी पुणे विद्यापीठ आणि आय.आय.टी. यांचा संयुेीक अभियांत्रिकी अभ्यासक्रम तयार

करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासक्रम हा लोकाभिमूख (झशेश्रिश उशपींीळल) असावा अशी

अभ्यासक्रमाची रचना केली आहे. विद्यापीठ हे लोकांसाठी आहे, हाच त्या मागचा उद्देश आहे. परीक्षा

पद्धत आंतरराष्ट ्रीय दर्जाची म्हणजे निवडश्रेणी पद्धतीने अभ्यासक्रम (उहेळलश इरीशव उीशवळीं

डूीींशा) राहणार असून विद्याथ्यारच्या परिक्षा 6 महिन्याऐवजी (डशाशीींशी) दर चार महिन्यांनी

(ढीळाशीींशी) घेण्यात येतील, त्यामुळे मुलांना अभियांत्रिकी बरोबर इतरही जीवनावश्यक विषय

शिकता येतील. डेषीं डज्ञळश्रश्र, र्उेााीपळलरींळेप डज्ञळश्रश्र । र्चीश्रींळीज्ञळश्रश्री यावर भर देण्यात आलेला

आहे. संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक (अलरवशाळल उरश्रशपवरी) तयार करण्यात आले असून परीक्षा

ठरलेल्या वेळीच सुरू होतील व परीक्षांचे निकालसुद्धा ठरलेल्या वेळेतच लागतील तसेच महाविद्यालय

सुद्धा ठरलेल्या वेळेतच सुरू होतील याची आखणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर धर्म म्हणजे

कर्मकांड नव्हे तर ‘‘धर्मग्रंथ म्हणजे जीवनग्रंथ’’ जीवन कसे जगावे व कसे जगू नये याचे ही धडे मुलांना

दिले जातील. त्याचबरोबर विविध धर्मामध्ये सुसंवाद राहावा यासाठी त्या त्या धमारचे तत्त्वज्ञान समजावून

घ्यावे लागेल. ध्यान, योगा आणि अध्यात्म यांचे धडे देऊन यातून सर्वगुणसंपन्न असा आदर्श नागरिक

घडवायचा संस्थेचा मानस आहे व प्रा. डॉ. विश्वनाथ कराड त्यासाठी आग्रही आहे.

शिकणे – शिकविणे पद्धतीत आमुलाग्र बदल

(ढशरलहळपस ड्ढ श्रशरीपळपस, र्ींशीू ळपर्पेींरींर्ळींश)

आमची शिक्षणपद्धती आजही खडू-ङ्गळा (उहरश्रज्ञ । इश्ररलज्ञ इेरीव) अशी एकतर्ङ्गी आहे.

प्राध्यापक शिकवत असतात व विद्यार्थी ऐकत असतात, या पद्धतीला या विद्यापीठात कायमचा ङ्गाटा

देण्यात आला आहे. ही पद्धत विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यामध्ये संवाद साधणारी (खपींशीरलींर्ळींश)

व्हावी यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे वर्गामध्ये शिकविण्यासाठी एकाच वेळी दोन प्राध्यापक

पाठविण्यात येतील. एक प्राध्यापक विषयाची सुरूवात करतील तर दुसरे प्राध्यापक याच विषयावर

विद्याथ्यारना बोलायला उद्युक्त करतील त्यामुळे विद्यार्थी चर्चेत भाग घेऊ शकतील व त्यांना तो विषय

अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल. ही ‘‘द्वी प्राध्यापक पद्धती’’ मला वाटते कदाचीत आपल्या

देशातच नाविन्यपूर्ण आहे. महाविद्यालयाचा पहिला तास नित्याने ‘‘सर्व धर्म सम भाव’’ सामुदायिक

प्रार्थनेने सुरू होईल व त्यानंतर प्रत्येक विद्याथ्यारस 10 मिनिटांचे ‘संगीत ध्यान’ (र्चीीळलरश्र

चशवळींरींळेप) याचा एक पाठ देण्यात येईल. त्यामुळे हे विद्यार्थी अत्यंत शांत पद्धतीने अध्ययनामध्ये

नंतर रमून जातील.

भारतीय संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचा आंतरभाव

21 व्या शतकामधे जगावर विज्ञान, माहितीतंत्रज्ञान आणि विविध माध्यमे, दूरदर्शन, अनेक

वाहिन्या यांचे जणू आक्रमणच झालेले आहे आणि याचे काही दृष्य प्रतिकूल परिणामही दिसू लागले

आहेत. जे जे पाश्चिमात्य आहे तेच उत्तम आहे अशा प्रकारचा विचार तरुणांच्यामधे बळावतो आहे.

पाश्चिमात्यांच्या चालीरितींचे अंधानुकरण ङ्गार मोठ्या प्रमाणावर आज तरुण पिढीमध्ये दिसते, यामुळे

प्रा. कराड सर व्यथित होतात. तरुणांच्यामधे भारतीय अस्मितेचा जागर करावयास हवा हे आता त्यांनी

ठरवून टाकले आहे. भारतीय संस्कृतीची मूल्ये विद्याथ्यारनी समजून घेतली पाहिजे व त्याप्रमाणे

त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे यासाठी प्रा. डॉ. कराड सर सतत आग्रही असतात. मातृ देवो भव, पितृ

देवो भव, आचार्य देवो भव व अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची मुख्य अशी चिरंतन विश्वात्मक

मूल्ये आहेत. भारतीय तरूणांमध्ये हे रुजविण्यासाठी स्वतंत्र विभाग सदर विद्यापीठात कार्यान्वित

करण्यात आलेला आहे. यासाठी ‘‘संचालक, सामाजिक शास्त्रे व मूल्याधिष्ठित शिक्षण’’ यासाठी

अनुभवी प्राध्यापकाची विद्यापीठात नेमणूक करण्यात आली आहे.

वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यिेमत्त्व विकास

‘‘वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यिेमत्त्व विकास’’ ही राज्यस्तरावर

हायस्कूलच्या विद्याथ्यारसाठी स्वायत्त प्रमाणपत्र परीक्षा दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसर्‍या रविवारी

घेतली जाते आणि त्यासाठी विद्याथ्यारना दिली जाणारी लाखो रुपयांची बक्षिसे हे सर्व पाहिल्यानंतर

भारतीय अस्मिता तरुणांच्यामध्ये जागविण्याचा प्रा. डॉ. कराड सर यांनी ध्यास घेतला आहे असेच

म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या प्रगत अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.

रामेश्वर (रूई), ता. जि. लातूर या त्यांच्या जन्मगांवी श्री राम मंदिर, जामा मस्जिद, ह. जैनुद्दीन चिश्ति ंचा

दर्गा, श्री राम रहिम सेतू आणि तथागत गौतम बुद्ध विहार बांधून त्यांनी जणू रामेश्वर (रूई) येथे मानवता

तीर्थच स्थापन केले आहे. या सर्व स्थळांना विश्वशांती विद्यापीठाची प्रयोग शाळाच म्हणावी लागेल.

आंतरराष्ट ्रीय स्तरावर सन्मान

प्रा. डॉ. कराड सरांच्या या सांप्रदायिक सद2भावाच्या कार्यामुळेच त्यांना अमेरिकेत युटा

प्रातांतील ‘‘सॉल्ट लेक’’ येथे भरलेल्या 9 व्या जागतिक धर्मसंसदेत प्रमुख भाषण देण्यासाठी 2015

मध्ये निमंत्रीत करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. डॉ. कराड सरांनी आपल्या भाषणाचा शेवट अथर्व

वेदातील एका उतार्‍याने केला. ते म्हणाले होते की, आपण जरी भिन्न धर्मीय असलो तरी एकाच ईश्वराची

लेकरे आहोत व आपण एकाच पृथ्वीवर राहतो, एकाच हवेचा श्वास घेतो आणि एकाच सूर्यापासून ऊर्जा

घेतो तेंव्हा आपण सवारनी एकत्र येऊन या पृथ्वीचे रक्षण केले पाहिजे तरच जगात विश्वशांती नांदेल व

आपण गुण्यागोविंदाने राहू शकू. पुढे ते असे म्हणाले कि भारतीय संस्कृतीची हीच तर विशेषता आहे,

असे सांगुन त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या धर्मसंसदेतील भाषणाची आठवण करून दिली व आपल्या

भाषणाचा शेवट केला.

स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील विद्यापीठ

मा. प्रा. डॉ. कराड सरांचे भाषण संपताच त्या प्रचंड सभागृहात जगातील विविध धर्मातील

10,000 प्रतिनिधींनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून प्रा. डॉ. कराड सरांचा सन्मान केला. हे मी

स्वत… प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावेळी मी त्या सभागृहात हजर होतो. संपूर्ण वातावरणच त्यावेळी रोमांचित

झाले होते. त्यावेळी एकच उद2गार माझ्या तोंडून आले की ‘‘आज पुन्हा एकदा अवतरले स्वामी

विवेकानंद’’. अशाप्रकारे प्रा. डॉ. कराड सरांच्या या विश्वशांतीच्या कार्याला आंतरराष्ट ्रीय स्तरावर

मान्यता मिळाली. 2 जानेवारी 2007 रोजी युनेस्को पॅरीस या आंतरराष्ट ्रीय परिषदेत प्रा. डॉ. विश्वनाथ

कराड यांनी तत्कालीन भारताचे ‘‘मनुष्यबळ विकास मंत्री’’ यांचे मार्ङ्गत भारतात विश्वशांती विद्यापीठ

सुरू करावे असा प्रस्ताव दिला होता. 2017 रोजी तब्बल 10 वषारनी का होईना प्रा. डॉ. विश्वनाथ

कराड यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आणि महाराष्ट ्र शासनाने ‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस

विद्यापीठास’’ मान्यता दिली. विशेष म्हणजे नुकतेच दि. 5 जून 2017 रोजी भारताचे मनुष्यबळ विकास

मंत्री मा. नामदार प्रकाश जावडेकर यांनी ‘‘प्रा. डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी. वर्ल्ड पीस

युनिव्हर्सिटी’’ च्या परिसरात देशातील ‘‘शाश्वत सवारगीण विकासाची’’  पहिली मुहूर्तमेढ

रोवली हा एक सुवर्णयोगच म्हणावा लागेल.

हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की, जणू विश्वशांती वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या रूपाने पुणे येथे

स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील विद्यापीठच साकार झाले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *