नवी दिल्ली- भारताने तुरुंगात असलेल्या 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या सर्व कैद्यांना मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. याच पार्श्वभूमिवर, हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात असले तरी या सर्व पाकिस्तानी कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे.
दरम्यान, भारताने मागील आठवड्यात दोन पाकिस्तानी मुलांची सुटका केली होती. 11 वर्षीय अली रेझा आणि 10 वर्षीय बाबर हे त्यांच्या चुलत्यासोबत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात दाखल झाले होते. मात्र, या मुलांचा चुलता मोहम्मद शहजाद हा भारताच्या कोठडीत असून, मुलांना मायदेशी पाठवण्यात आले होते.





