👁 7 Views

पंढरपूरच्या प्रांत कार्यालयास ठोकले टाळे शिवसेनेचे उग्र आंदोलन

पंढरपूरच्या प्रांत कार्यालयास ठोकले टाळे
शिवसेनेचे उग्र आंदोलन
* दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*
* चारही मयत बालकांच्या कुटूंबास अर्थिक मदत देण्याची मागणी* 
मदत देण्यासाठी व कारवाईसाठी आठ दिवसाची डेडलाईन
चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्डयात बूडून शहापूरकर व जुमाळे परिवारातील चार बालकांचा मृत्यु झाला असून ही दुर्घटना केवळ चंद्रभागेतून होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे या बालकांचा बळी पडला आहे.चंद्रभागेत अशा दुर्घटना वारंवार घडत असतानाही महसूल प्रशासन केवळ बघ्याची भुमिका घेत आले असून यास जबाबदार असणार्‍या महसूल प्रशासनातील संबधीत अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा  व पिडीत कुटुंबास तातडीने अर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी पंढरपूर शहर शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने येथील प्रांत कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.यामुळे दोन तास प्रांत कार्यालय बंद करण्यात आले.प्रांताधिकारी देशमुख यांनी निवेदन स्विकारताना ठोस कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले असले तरी आठ दिवसात या बाबत कार्यवाही न झाल्यास आपण शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन करणार आहोत व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप केंदळे यांनी दिला आहे.
          या आंदोलनावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलताना संदीप केंदळे म्हणाले की,चंद्रभागेच्या पात्रात वारंवार वाळूच्या खड्डयामुळे भाविकांचा बळी जात आहे.दरवेळी कारवाईचे आश्‍वासन दिले जाते व पुन्हा अवैध वाळू उपसा सुुरु होतो.महसूल प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडत असतानाही याची जबाबदारी निश्‍चित केली जात नाही.यापुढे चंद्रभागेत एकाही भाविकाचा वाळूच्या खडयामुळे मृत्यु झाल्यास त्यास जबाबदार  धरून तहसिलदार व प्रांतावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आपण उग्र आदोलन करु असा इशाराही यावेळी देण्यात आला.
       या आंदोलनात शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख संगिता पवार,राबिया शेख,शरिफा पठाण,अरुणा सरुवसे,संगिता सुरवसे ,शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय ढाळे,बाळासाहेब देवकर,ओंकार बसवंती,अजय व्यवहारे,नितिन थिटे,युवराज गोमेवाडीकर,सचिन खंकाळ,शिवसेना ग्राहक कक्षाचे उपजिल्हा प्रमुख सिध्दनाथ कोरे,कृष्णा कवडे,मा.नगराध्यक्ष संजय घोडके,योगेश मिसाळ,नितिन अंकुशराव,आप्पा औसेकर,भैय्या पवार,मंगेश क्षिरसागर यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *