👁 10 Views

चंद्रभागेच्या वाळवंटात दोन महिन्याच्या मुलीस सोडून महिला पसार


चंद्रभागेच्या वाळवंटात दोन महिन्याच्या मुलीस सोडून महिला पसार विक्रम शिरसट मित्र मंडळाने घेतली धाव अपत्यास केले पोलीसांच्या स्वाधीन चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलीक मंदीर शेजारीच दोन महिन्याच्या स्त्री जातीच्या अपत्यास सोडून दोन महिला पसार झाल्या असून या घटनेची माहीती मिळताच नगरसेवक विक्रम शिरसट यांनी या ठिकाणी धाव घेतली व पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास या घटनेची माहीती दिली.यावेळी पो.कॅा.शेख यांच्या ताब्यात सदर बालीकेस देण्यात आले .काही प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहीतीनुसार दोन महिला या बालीकेस सोडून पसार झाल्या आहेत.                 या बाबत अधिक माहीती देताना विक्रम शिरसट म्हणाले की,या ठिकानी लावण्यात आलेला सी.सी.टि.व्ही.बंद अवस्थेत आहे.या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत असतात.यापुर्वीही अनेकवेळा मृत अथवा जिवंत अभर्के वाळवंटात सोडून जाण्याचे प्रकार घडले आहेत.आजच्या घटनेतील बालीका ही केवळ दिड ते दोन महिने वयाची असून तीला उघडयावरच टाकण्यात आले होते.सुदैवाने काही कार्यकर्त्यांच्या नजरेस ही बालीका आल्याने तीचे प्राण वाचले आहेत.बेवारस अवस्थेत उघडयावर टाकलेल्या जीवंत अथवा मृत अर्भके अनेकवेळा भटक्या कुत्र्यांचे भक्ष झाल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे.त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या व इतरही दुदैवी घटना सातत्याने घडतात हे लक्षात घेवून भक्त पुंडलीक मंदीराशेजारी कायमस्वरुपी पोलीसचौकी सुरु करण्यात यावी यासाठी आपण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.      
   यावेळी दत्तात्रय अधटराव,सोनू माने,सोमनाथ कोळी,आनंद कोळी,अमोल तारापूरकर,रमेश तारापूरकर यांच्यासह विक्रम शिरसट मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *