पुणे, दि. 13 – सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली. मात्र, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखेतून आपले कर्ज माफ करून घेण्यासाठी तसेच नविन कर्ज घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना खाली हात परतावे लागत आहे. शासनाचा कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे बॅंकाकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील अनेक संबंधित सर्व बॅंका सोमवारपासून शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शासनाने कजर्माफीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी सहकारी आणि राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखांकडून कृषी विभाग आणि पीक कर्ज विभागाचे अधिकारी बैठका घेऊन आकडेवारी गोळा करत होते. अग्रणी बॅंकांच्या अधिकाऱ्यांमार्फत गोळा केलेली आकडेवारी राज्यशासनाकडे पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, बॅंका अजूनही कर्जमाफीच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




