👁 7 Views

उज्ज्वल भारत निर्माणसाठी मुलांना शिक्षण देणे गरजेचे – तदर्थ जिल्हा न्यायाधिश श्रीमती आर.के.शेख

पंढरपूर दि. 15 :- उज्ज्वल भारत निर्माण करण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण व संगोपन मिळवून देण्याबरोबरच त्यांना शाररीक व मानसिकदृष्ट्या सदृढ बनविणे गरजेचे आहे असे तदर्थ जिल्हा न्यायाधिश  श्रीमती आर.के.शेख यांनी सांगितले.
            तालुका विधी सेवा समिती व बार असोशिएशन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  पंतनगर पंढरपूर येथे जागतीक बालकामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी  न्यायाधिश मिलिंद बुराडे, न्यायाधिश सुरेश शिंदे, न्यायाधिश संदिप सरोदे, न्यायाधिश  ज्ञानेश्वर रजपुत, न्यायाधिश  राहुल शिंदे व बारअसोशिएशनचे सचिव सुभाष शिंदे उपस्थित होते.
            यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधिश श्रीमती शेख बोलताना म्हणाल्या की, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून मजूर म्हणून कामावर पाठविणे हे देशाचे भाविष्य धोक्यात आणण्यासारखे आहे अशी भिती व्यक्त केली. तसेच बालमजूरी रोखण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शनही  त्यांनी यावेळी केले.
            बालमजूरी रोखणे ही प्रत्येकाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. 14 वर्षाखालील लहान मुलांना शिक्षणापासूण वंचित ठेवून मजूरीस पाठविणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे न्यायाधिश राहुल शिंदे यांनी सांगितले. तसेच ॲड.विनायक सरवळे, ॲड.उद्धव बागल यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.बी.एम.लामकाने , यांनी केले. यावेळी बांधकाम अभियंता तुकाराम राउुत, तालुका विधी सेवा समितीचे आर.बी.दणुरे तसेच कर्मचारी व कामगार उपस्थित होते.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *