महाराष्ट्रातील नगरपरिषद नगराध्यक्ष महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी च्या निवडीची सभा नगरपरिषद महासंघाचे अध्यक्षदत्तात्रेय मसुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष महासंघाचे संयोजक रणजीत श. चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीतअखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, अंधेरी, मुंबई येथील मेयर्स हॉल मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व नगराध्यक्षांना एकत्रित बोलविणयात आले होते व या नगराध्यक्षांमधुन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांची महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल आमदार प्रशांतराव परिचारक, सर्व सभापदी व नगरसेवक व शहरातील प्रतिष्टीत नागरीकांनी सौ.साधनाताई नागेश भोसले यांना भेटुन व दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील ३३० नगरपरिषदेमधुन नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्ष पदी मला काम करण्याची संधी आमदार प्रशांतराव परिचारक व सर्व नगरसेवकांच्या सहकार्यामुळेच मिळली आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. या निवडीच्यावेळी स्थायी समिती सदस्य सौ.सुप्रिया सचिन डांगे हे उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा




