👁 11 Views

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अर्ज करण्यासाठी मुदतवाढ


मुंबई, दि. 16 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2017 साठी देशभरातून युवकांचा मिळत असलेला मोठा प्रतिसाद व अर्ज करण्यासाठी अधिक मुदत मिळावी ही मागणी लक्षात घेता, फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 जून 2017 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना या कार्यक्रमाद्वारे राज्याच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उत्साहीजबाबदार व उद्यमशील युवकांचे या कार्यक्रमासाठी स्वागत करीत तुमची कल्पकतानाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची कास शासनात रुजविण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली मुख्यमंत्री फेलोशिप योजना गेल्या 2 वर्षांपासून शासनाच्या नियोजन विभागामार्फत राबविली जात आहे. प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. युवकांचा उत्साहनाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश. सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनोखा अनुभव या कार्यक्रमामुळे मिळतो.
२१ ते २६ वर्षे वयकोणत्याही शाखेची प्रथम वर्ग पदवी,एक वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठीचे ज्ञान या निकषात बसणारा कोणीही युवक/युवती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकेल. ११ महिन्यांच्या या कार्यक्रमादरम्यान दरमहा विद्यावेतनही दिले जाते.
सामाजिक विकास क्षेत्रात रस असणाऱ्या तरुणांमधील नेतृत्त्वगुण जोपासणेत्यांचे प्रशासनासंदर्भातील ज्ञान वृद्धिंगत करणेभविष्यातील नेतृत्त्वाच्या मोठ्या संधींसाठी युवकांना तयार करणे यासाठी कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना धोरण निर्मितीअंमलबजावणीसंनियंत्रण आणि मूल्यमापन अशा विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये शासनासोबत काम करण्याची दुर्मिळ संधी मिळते. त्या सोबतच राज्यातील विविध नामांकीत संस्थांना भेटी तसेच उद्योगकला,लेखनपत्रकारितामनोरंजन आदी क्षेत्रातील नामवंतांच्या भेटींच्या संधीही या कार्यक्रमामुळे फेलोजना मिळतात.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा या युवकांच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरतो आहे. धोरणप्रशासनराज्यशास्त्र,व्यवस्थापन या क्षेत्रातील उच्चशिक्षण वा व्यावसायिक संधी या कार्यक्रमामुळे सहज साध्य होऊ शकतात.
फेलोशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून २०१७असून अधिक तपशीलासाठी http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *