– काश्मिरात जवानांची मोठी कामगिरी
– घरात घेतला होता आश्रय, एकाला जिवंत पडकले
श्रीनगर, १६ जून
दक्षिण काश्मिरातील एका घरात आश्रय घेणार्या आणि तेथील नागरिकांना ढाल बनवून लष्करी जवानांवर गोळीबार करणार्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांचा जवानांनी आज शुक्रवारी खात्मा केला. यात तोयबाचा क्षेत्रीय कमांडर जुनैद मट्टूचा समावेश आहे. त्याला ठार करण्यात आल्यामुळे तोयबाची मोठी पिछेहाट झाली आहे. या कारवाईत एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहाराच्या अर्वानी गावात आज सकाळी काही अतिरेकी आले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या भागात मोहीम हाती घेतली.
जवानांना पाहताच या अतिरेक्यांनी एका घरात आश्रय घेतला आणि तेथील नागरिकांना ढाल बनवून गोळीबार सुरू केला. नागरिकांना कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेताना जवानांनी अतिशय सावधपणे पावित्रा घेतला आणि अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले असून, यातील एक तोयबाचा क्षेत्रीय कमांडर जुनैद मट्टू असून, दुसर्याचे नाव मुझम्मिल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या तिसर्या साथीदाराला जिवंत पकडण्यात जवानांना यश आले आहे. जुनैदने मागील वर्षी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस मृत्युमुखी पडले होते. जुनैद गेल्या दोन वर्षांपासून तोयबासाठी काम करीत होता. त्याच्यावर दहा लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.
दोन नागरिकांचा मृत्यू
दरम्यान, घरातील अतिरेक्यांना ठार मारण्याच्या या कारवाईत दोन नागरिकही ठार झाले आहेत. यातील एकाचे नाव मोहम्मद अश्रफ असे असून, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना तो मधात आल्याने एक गोळी त्याला लागली. या घटनेनंतर काही लोकांनी जवानांवर दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी जवानांनी पेलेट गनचा वापर केला. यात एक नागरिक जखमी झाला, अशी माहिती सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

गेल्या वर्षापासून भारतीय लष्कराला मिळालेले हे तिसरे मोठे यश आहे. बुरहान वाणी, त्याचा साथीदार अहमद भट याच्यानंतर मट्टूला ठार मारण्यात यश आले आहे. काश्मीर खोर्यातील १२ वॉण्टेड अतिरेक्यांच्या यादीत जुनैदचा समावेश होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111