आषाढी एकादशी सोहळ्यासाठी देहु आळंदीहून पालखी सोहळे रवाना होताच पंढरीत आषाढी यात्रेच्या पुर्वतयारीची लगबग सुरु होते.लाखोंच्या संख्यने येणार्या भविकांना सुरळीतपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी नगर पालीका पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून सभापती विक्रम शिरसट हे पाणी पुरवठा विभागाअर्तंगत कार्यरत असणार्या कर्मचार्यांच्या सहाय्याने जागोजागी पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनची पाहणी करुन गळती रोखण्याचे व आवश्यक तेथे कुजलेल्या पाईपलाईन बदलण्याचे काम करण्यात येत आहे.यावर्षी सर्वत्र वरुणराजाने कृपा केल्याने राज्यात आनंदाचे वातावरण असून त्यामुळे या आषाढी यात्रेत भाविकांची संख्या वाढणार असल्याची शक्यता गृहीत धरुन आम्ही उपाययोजना करीत आहोत अशी माहीती नगर पालीका पाणी पुरवठा विभागाचे सभापती विक्रम शिरसट यांनी दिली आहे.
पंढरपूर शहरात आठ रस्त्यांच्या कामासह अनेक ठिकाणी रस्त्यांची व इतर विकास कामे सुरु आहेत.या कामांच्या खोदाईत अनेक ठिकानी पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईन फुटल्या आहेत.अथवा त्यांना गळती लागली आहे.त्यामुळे यात्रा कालावधीत सुरळती पाणी पुरवठा करण्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवुन नगर पालीका पाणी पुरवठा विभागाने शहरात अनेक ठिकानी युध्दपातळीवर कामे हाती घेतली आहेत.येथील जुन्या दगडी पुलानजिक टाकण्यात आलेल्या स्टॉर्म वॉटर पाईपलाईनमुळे चंद्रभागा नदीच्या वाळवंटात भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी उभारण्यात आलेल्या नळांचा पाणी पुरवठा धोक्यात आला होता.मात्र सभापती विक्रम शिरसट यांनी तातडीने या ठिकाणची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
न.पा.पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शहरात सद्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामावर उपस्थित राहून स्वत: विक्रम शिरसट हे पाहणी करीत आहेत.जुन्या दगडी पुलानजिक असलेल्या पाईपलाईन दुरुस्ती काम दोन दिवसात पुर्ण होईल अशी माहीती विक्रम शिरसट यांनी दिली आहे.यावेळी विजय अभंगराव,सोनू अधटराव,पांडुरंग अधटराव,अमर घाटे,अनिकेत शिरसट,विनायक अधटराव,अनिल तारापूरकर यांच्यासह नगर पालीका पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




