👁 10 Views

महाराष्ट्र बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

मुंबई, १८ जून 
रिझर्व्ह बँकेने आता बँक ऑफ महाराष्ट्रविरोधात बुडीत कर्जांप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बँकेच्या बुडीत कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई सुरु केली आहे. यामुळे आता बँकेच्या नव्याने कर्ज वितरण करण्यावर तसेच लाभांश वितरणावर स्थगिती येणार आहे.
बँकांची ढोबळ बुडीत कर्जे १० टक्क्यांवर गेल्यास रिझर्व्ह बँकेकडून अशा प्रकारची कारवाई केली जाते. महाराष्ट्र बँकेला मार्चअखेर संपणार्‍या आर्थिक वर्षात तब्बल ४.५५ अब्ज रुपयांचा तोटा झाला आहे.
दरम्यान, बुडीत कर्जांचे प्रमाण तब्बल ११.७६ टक्क्यांवर पोहचले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा बँकेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. या उलट, या सर्व उपायोजनांमुळे बँकेची एकूण कामगिरी सुधारण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र बँकेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र बँक ही रिझर्व्ह बँकेकडून बुडीत कर्जाबाबत कारवाई सुरु झालेली पाचवी बँक ठरली आहे. याआधी आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँकेवर कर्ज थकबाकीवर कारवाई केली आहे. (वृत्तसंस्था)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *