👁 10 Views

शहीद संदीप जाधवांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद,दि.24 : भारतपाक सिमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सैन्य दलातील नाईक संदीप सर्जेराव जाधव यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात आज सकाळी 10 वाजता केळगाव ता.सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेआमदार अब्दुल सत्तारजिल्हाधिकारी नवल किशोर रामपोलीस अधीक्षक आरती सिंहजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोलेतहसीलदार संतोष गोरड यांनी शहीद जवान संदीप जाधव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिलीसैन्य दलाच्या पथकाने सलामी देऊन शोक धून वाजवून हवेत तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहिली.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात म्हणाले कीशहीद जवान संदीप यांना वीरमरण आले आहेत्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला,त्यांच्या दु:खात शासन सहभागी आहेदेशभक्त जवान शहीद झाल्याने सर्वांनाच दु:ख झाले आहे.
खासदार चंद्रकांत खैरेआमदार अब्दुल सत्तारसुरेश बनकरबालयोगी काशीगिरी महाराज आदींनीही यावेळी श्रद्धांजली वाहिली.
शहीद संदीप जाधव यांच्या अंत्यसंस्कारात केळगाव पंचक्रोशीतील हजारो स्त्री पुरुष सामील झालेयावेळी देशभक्तीपर जयघोषात अंत्यसंस्कार होताना उपस्थितांची मने हेलावून गेली.  भारत माता की जय हा नारा भारताची एकात्मता व राष्ट्रवाद दर्शवित होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *