👁 10 Views

मोदींच्या स्तुतीत ट्रम्प यांनी केला या 5 गोष्टींचा उल्लेख, अशी राहिली दोघांची केमिस्ट्री

मोदींनी ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले ते त्यांनी स्वीकारले.




नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये पहिली भेट झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांची स्तुती केली. मोदींनी ट्रम्प यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले. मोदींनी ट्रम्प यांची कन्या इवान्कालाही भारत भेटीसाठी आमंत्रित केले. मोदींच्या अमेरिका भेटीने भारताला दोन महत्त्वाच्या आघाडीवर यश मिळाले आहे. पहिले हे की मोदींच्या भेटीपूर्वी अमेरिकेने हिजबुल मुजाहिदीन या काश्मिरी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सहाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. दुसरे – मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त निवेदनात पाकिस्तानचा उल्लेख आला.
मोदींची स्तुती करताना ट्रम्प काय म्हणाले…


#1) मोदी महान आहेत
– ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मोदी महान आहेत. एका महान पंतप्रधानांचे स्वागत करता येणे हा आमचा सन्मान आहे. मी त्यांच्याबद्दल बोलत आणि वाचत असतो. ते चांगले काम करत आहेत.’


#2) जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्याचे स्वागत करणे हा आमचा सन्मान
– ट्रम्प म्हणाले, ‘मी नेहमीच भारत देश आणि भारतीयांकडून शिकत असतो. तुमची संस्कृती आणि परंपरा ही ऐतिहासिक आहे. हा माझा सन्मान आहे की मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्याचे स्वागत करत आहे.’
#3) भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोदींचे अभिनंदन
– ‘भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सर्वात वेगाने वाढत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये भारताने चांगले काम केले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था अधिक वृद्धी करत आहे.’
#4) मोदींना सलाम
– ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सॅल्यूट करतो. मला हे सांगायला अभिमान वाटत आहे की मी आणि मोदी सोशल मीडियाचे वर्ल्ड लिडर आहोत.’
#5) साधारण प्रत्येक गोष्टीवर आमचे एकमत
– व्हाइट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये ट्रम्प म्हणाले, ‘भारत आणि अमेरिकेमध्ये आज सारखे एवढे चांगले आणि मजबूत संबंध याआधी कधीच नव्हते. साधारण प्रत्येक गोष्टीवर आमचे एकमत आहे. आज दिवसाचा शेवट करताना मी हेच सांगू इच्छितो की आम्ही हे परस्पर संबंध असेच कायम ठेवू.’
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *