👁 8 Views

कृषी दिनानिमित्त आज विविध पुरस्कार वितरण

  सोलापूर दि.30 :-  आत्मा, कृषी विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमानाने 1 जुलै 2017 रोजी कृषि दिन आयोजन करण्यात यावयाचे आहे. या अनुषंगाने कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन जिल्हास्तरावर साजरा करण्यात येणार आहे.
      सकाळी 11.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख , आमदार सिध्दराम म्हेत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या वेळी आत्मा सोलापूर यांचे वतीने सन 2016-17 मधील उत्कृष्ट शेतकरी, उत्कृष्ट गटांकरिता पारितोषिक, उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी पुरस्कार, उत्कृष्ट शेती मित्र पुरस्कार, उत्कृष्ट तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, उत्कृष्ट कृषी सहाय्यक इत्यादी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतक-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा विजयकुमार बरबडे यांनी केले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *