👁 9 Views

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर दि.30 :-  मंत्री, जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण प्रा. राम शिंदे  हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे –

           सोमवार दिनांक 03 जुलै 2017 रोजी दुपारी 02.00 वाजता अहमदनगर येथून ( करमाळा- टेंभुर्णी मार्गे) शासकीय मोटारीने मोहोळ येथे आगमन. माहोळ तालुका धनगर समाज सुधारक मंडळ मध्यवर्ती कार्यालयास भेट. 02.30 वाजता शासकीय मोटारीने सोलपूर कडे प्रयाण. 03.00 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 05.15 वाजता शासकीय मोटारीने श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर कडे प्रयाण. 05.30 वाजता ॲम्पी थिएटर, श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे आगमन व श्री गोपाळराव देशमुख लिखीत सुभेदार मल्हारराव होळकर एक राष्ट्रप्रमुख या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. रात्री 07.30 वाजता शासकीय मोटारीने पंढरपूर जि. सोलापूरकडे प्रयाण. 09.00 वाजता शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे आगमन व राखीव.
मंगळवार दिनांक 04 जुलै 2017 रोजी पहाटे 02.00 वाजता शासकीय मोटारीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे प्रयाण. 02.15 वाजता श्री  श्री विठ्ठल रूक्मिणी  मंदिर , पंढरपूर येथे आगमन व मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत शासकीय महापुजेस उपस्थिती.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *