👁 9 Views

२०२२ पर्यंत सर्व भारतीयांना घरे देणार : पंतप्रधान

‘‘२०२२ मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. यासाठी २०२२ पर्यंत आम्ही भारतातील सर्व गरीबांना घरे देणार आहोत. त्यासोबतच वीज आणि पाणी यासारख्या सुविधाही उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केले. 
नरेंद्र मोदी सद्या इस्रायलच्या दौऱ्यावर असून, त्‍यांनी बुधवारी तेल अवीव येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. ७० वर्षात पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान इस्रायल दौरा करत आहेत. एका जवळच्या मित्राला अनेक दिवसांनी भेटल्याची भावना आपल्या मनात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, इस्रायमध्ये मराठी भाषेत ‘मायबोली’ नावाचे मासिक प्रकाशित होते, याबद्दल आनंदही व्यक्त केला.
विद्यमान सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुतंवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लहानसहान गोष्टींसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. तसेच जर एखाद्या तरुणाला स्टार्टअप सुरु करायचे असेल, तर तो एका दिवसात नोंदणी करुन आपला उद्योग सुरु करु शकतो,” असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारत आणि इस्रायलचे संबंध परस्पर विश्वास, मैत्री आणि सांस्कृतिक वारशावर प्रस्थापित झाले आहेत. इस्रायलच्या शौर्याला मी प्रणाम करतो. हेच शौर्य इस्रायलच्या विकासाचा पाया आहे. संख्या आणि आकार एवढा महत्त्वाचा नाही, हे इस्रायलने जगाला सिद्ध  करून दाखविले असल्‍याचे नरेंद्र मोदी म्‍हणाले. 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  
















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *